Happy New Year 2024: न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई आणि आतिषबाजीनं परिसर उजळला

Happy New Year 2024: भारतात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांसाठी अवघे काही तास उरले आहेत. पण जगातील काही देशात नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं आहे.
Happy New Year 2024
Happy New Year 2024Saam tv
Published On

Happy New Year New zealand:

भारतात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांसाठी अवघे काही तास उरले आहेत. पण जगातील काही देशात नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर रोषणाई आणि आतिषबाजीने देश उजळून निघाला आहे. न्यूझीलंडच्या स्काय टॉवरवर आतिषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Happy New Year 2024
China Red Army: रेड आर्मीचे ९ वरिष्ठ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ? काय आहे ड्रॅगनची रणनीती? जगाच्या नजरा खिळल्या चीनवर

शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये हार्बर ब्रिजवर फटाक्यांच्या आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील आतिषबाजी जगभरातील ४० लाख कोटीहून अधिक लोक पाहतात.

ऑस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सिडनीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी पाहायलाही लाखो लोक एका ठिकाणी जमा होतात'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Happy New Year 2024
Indian Politics: 'दीदींनाच युती नको आहे...',अधीर रंजन चौधरींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल , इंडिया आघाडीत संघर्ष वाढतोय का?

न्यूयॉर्कच्या एका वृत्तसंस्थेनुसार, अधिकारी आणि पार्टी आयोजकांचं म्हणणं आहे की, 'मजा-मस्ती करणाऱ्या गर्दीचं स्वागत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत. शुक्रवारी न्यूयॉर्कच्या सुरक्षेवर शहराचे महापौर एरिक एडम्स यांनी भाष्य केलं आहे. 'नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला कोणत्याही प्रकारचा धोका नाही'. नव वर्षाचं स्वागत करताना मिटडाएऊन मॅनहट्टनच्या केंद्रात हजारो लोक येण्याची शक्यता आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com