

बालेन शाह यांनी संसदेत भारतीय जमिनीवर नेपाळकडूनही अतिक्रमण झाल्याचे मान्य केले.
संसदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधान शाह यांनी हे विधान केलं
नेपाळी काँग्रेसने पंतप्रधान बालेन शाह यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
आपल्या निर्णयामुळे माध्यामांमध्ये चर्चेत आलेले नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बलेंद्र शाह पु्न्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी ते कोणत्या निर्णयामुळे नाही तर आपल्या एका विधानामुळे. पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादासंदर्भात संसदेत एक धक्कादायक वक्तव्य केलंय.
प्रतिनिधी सभेतील (संसदेतील) खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळने भारतीय जमिनीवर आक्रमण केल्याचं मान्य केलंय. सीमेवर अतिक्रमण केवळ एकाच बाजूने नाही, तर दोन्ही बाजूंनी झालंय. भारतासोबत नेपाळनेही भारतीय हद्दीवर अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. संसदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधान शाह यांनी हे विधान केलं आहे.
खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, "हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल—हे मलाही नुकतेच समजले आहे. हे केवळ भारताकडूनच नाही; नेपाळनेही भारतीय भूभागावर अतिक्रमण केलंय. " परंतु पंतप्रधानांनी हे अतिक्रमण झालेल्या ठिकाणांची नेमकी नावे किंवा याची माहिती दिली नाही. त्यांनी पुढे यावर जोर दिला की, हे मुद्दे अधिक गुंतागुंतीचे करण्याऐवजी, दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चेद्वारे, राजनैतिक वाटाघाटीने परस्पर अतिक्रमणाचा हा संपूर्ण प्रश्न एकदाचा कायमचा सोडवला पाहिजे.
यासह प्रस्थापित सीमा विवादांचा संदर्भ देत पंतप्रधान शाह यांनी पुष्टी केली की, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा व्यापारी मार्गासंदर्भात नेपाळने पाठवलेल्या राजनैतिक पत्रांना नवी दिल्लीने प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे नेपाळच्या संसदेत मोठा गदारोळ उडाला. प्रमुख विरोधी पक्ष, नेपाळी काँग्रेसने पंतप्रधान बालेन शाह यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नेपाळी काँग्रेसच्या मुख्य प्रतोदांनी हे वक्तव्य अत्यंत संवेदनशील आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटलंय. पंतप्रधानांनी त्याबाबत तात्काळ पुरावे आणि स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.