Nepal Government: 'प्रचंड' अविश्वास; नेपाळमधील सरकार कोसळलं

Pm Pushpa Kamal Dahal : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांना मोठा धक्का बसलाय. पुष्प कमल दहल यांनी विश्वासदर्शक ठराव गमावला. यासह त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय.
 'प्रचंड' अविश्वास; नेपाळमधील सरकार कोसळलं
Pm Pushpa Kamal Dahal Saam Tv
Published On

'प्रचंड' अविश्वासाने नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांचं सरकार कोसळलंय. दहल यांनी संसदेत विश्वासदर्शक ठराव गमावला असून त्यांनी पराभव स्वीकारत आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. गेल्या आठवड्यात, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (CPN-UML) ने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. नेपाळच्या 275 सदस्यीय संसदेत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 194 मते पडली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांना फक्त 63 मते मिळाली.

विश्वासदर्शक ठराव मिळविण्यासाठी त्यांना किमान 138 मतांची आवश्यकता होती. 25 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर प्रचंड 4 वेळा विश्वासदर्शक ठराव मिळविण्यात यशस्वी ठरले. पण, यावेळी तो अपयशी ठरला. सीपीएन-यूएमएल आणि नेपाळी काँग्रेस यांनी युती केलीय. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सवादी लेनिनिस्ट यांनी सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेससोबत सत्ता वाटप करारावर स्वाक्षरी केली. यानंतर गेल्या आठवड्यात पुष्पकमल दहल यांनी प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर हे आधीच केपी शर्मा ओली यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिलाय. नेपाळी काँग्रेसचे संसदेत (प्रतिनिधीगृह) 89 जागा आहेत. तर सीपीएन-यूएमएलकडे 78 जागा आहेत. अशाप्रकारे दोघांचे 167 सदस्य झाले. यामुळे सभागृहातील बहुमतासाठी आवश्यक असलेला 138 जागांचा आकडा पार केलाय. सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांनी बुधवारी नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष देउबा यांची भेट घेतली होती.

सीपीएन-यूएमएल युतीनंतर नवीन आघाडी सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा करणे, हा या बैठकीचा उद्देश होता. काठमांडूच्या बाहेरील बुधनीलकंठ येथील देउबा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यासारख्या विषयांवर चर्चा झाली होती.

 'प्रचंड' अविश्वास; नेपाळमधील सरकार कोसळलं
Delhi News: आफ्रिकेतून भारत-नेपाळ सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी, डीआरआयने आंतरराष्ट्रीय टोळीचा केला पर्दाफाश; 15 कोटींचे कोकेन जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com