

नेपाळमध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा
सरकारचा आठवड्यातून दोन दिवस सुट्टीचा निर्णय
जागतिक तेल संकटाचा थेट परिणाम
पश्चिम आशियातील इराण-अमेरिका युद्ध आणि लाल समुद्रातील तणावाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. भारताच्या शेजारील देश नेपाळलाही बसला आहे. इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इंधनाची बचत करण्यासाठी नेपाळ सरकारने आता आठवड्यातून दोन दिवस (शनिवार आणि रविवार) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
युद्धामुळे जागतिक कच्चा तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे नेपाळला होणारा इंधन पुरवठा पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. नेपाळ आयल कॉर्पोरेशनला होणारा तोटा आणि परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे सरकारनं आपत्कालीन निर्णय घेतला आहे.
खासगी आणि सरकारी कार्यालये आता आठवड्यातून दोन दिवस बंद राहतील. यामुले वाहनांचा वापर कमी होऊन पेट्रोल-डिझेलची बचत होईल. यासह लवकरच वाहनांना दिल्या जाणाऱ्या इंधनावर मर्यादा आणली जाण्याची शक्यता आहे. लोकांना खासगी गाड्यांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नेपाळला बहुतांश इंधन पुरवठा भारताकडून केला जातोय. नेपाळमधील या संकटामुळे सीमावर्ती भागातील व्यापारावर परिणाम होऊ शकतो. तसेच नेपाळमधील नागरिक इंधनासाठी भारतीय सीमा ओलांडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य पूर्वेतील तणावामुळे आशियातील अनेक देशांमध्ये इंधन आणि (एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. यात पाकिस्तानची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाकिस्तानातही पेट्रोलच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने काही आपत्कालीन पावले उचलली आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेला शांत करण्यासाठी सरकारनं काही आपत्कालीन पावलं उचलली आहेत. इस्लामाबाद आणि पंजाबमध्ये पुढील ३०दिवसांसाठी सरकारी बसमधील प्रवास पूर्णपणे मोफत करण्यात आलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.