Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

PM Jhalanath Khanal Wife death : नेपाळमध्ये आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांचं घर पेटवून दिलं. या घटनेत माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. राजलक्ष्मी असं त्यांचं नाव होतं. खनल यांचं घर पेटवून दिल्यानंतर त्यात त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी या गंभीररित्या भाजल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवून दिले होते घर
नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू असून, माजी पंतप्रधानांचे घर देखील पेटवून देण्यात आले. यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. आंदोलकांनी सिंह दरबारही पेटवले. पीटीआय
Published On
Summary
  • नेपाळमध्ये हिंसक निदर्शने

  • भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीवरून जेन झी आक्रमक

  • आंदोलकांनी महत्वाच्या इमारती दिल्या पेटवून

  • माजी पंतप्रधानांच्या घरालाही आग, पत्नीचा होरपळून मृत्यू

नेपाळमधील हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि त्यात सोशल मीडियावरील बंदीनं तेल ओतल्यानं 'जेन झी'च्या संतापाचा आगडोंब उसळला. सोशल मीडिया बंदीचं निमित्त मिळालेली तरुणाई आक्रमक झाली. ती थेट संसदेत घुसली. संसदेची इमारत पेटवून दिली. दुसऱ्या दिवशी उद्रेक आणखी वाढला. नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झाले. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरही ही आग धुमसते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांच्या घरालाही आग लावली. त्यात त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काठमांडूच्या दल्लू परिसरात घडली. याच परिसरात माजी पंतप्रधान खनल यांचे घर आहे. ते आंदोलकांनी पेटवून दिले. आगीत माजी पंतप्रधानांच्या पत्नी राजलक्ष्मी या गंभीररित्या भाजल्या. त्यांना कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी, आंदोलकांनी केपी शर्मा ओली यांच्याही घरावर दगडफेक केली होती. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर युवा पिढीच्या संतापाचा भडका उडाला. काठमांडूमध्ये हिंसक निदर्शने झाली. आंदोलक तरुणांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ला चढवला. संसद भवनातही घुसून तोडफोड केली.

नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवून दिले होते घर
Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

अर्थमंत्र्यांना रस्त्यावर मारहाण

नेपाळमधील हिंसक आंदोलन अधिक तीव्र झालं. आंदोलकांनी देशाच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावर आणून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे केपी शर्मा ओली यांनीही पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसक आंदोलन करण्यात येत आहे.

अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल यांनाही जमावानं घेरलं. रस्त्यावर आणून त्यांना बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पौडेल यांच्या घराला आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यांच्या तावडीतून अर्थमंत्री पळताना दिसत होते. अचानक रस्त्यावरील आंदोलकांनी त्यांना लाथ मारली. त्यानंतर ते खाली पडले. या व्हिडिओची सत्यता पडताळून बघितलेली नाही.

नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवून दिले होते घर
Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com