

नीट पेपरफुटी प्रकरणातील मोठा खुलासा
संसदीय समितीसमोर NTAचा दावा
NEET परीक्षा रद्द का करण्यात आली
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर येताहेत. ज्या संस्थेवर परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी होती, तीच 'एनटीए' आता चक्क हात झटकून कशी मोकळी झालीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येतायत.... संसदीय स्थायी समितीसमोर हजर झालेल्या NTAच्या अधिकाऱ्यांनी पेपरफुटीवरून हात झटकल्याचा प्रकार समोर आलाय.."आमच्या यंत्रणेतून पेपर फुटलाच नाही, आणि जोपर्यंत सीबीआय तसा अहवाल देत नाही, तोपर्यंत आम्ही पेपरफुटी मान्य करणार नाही," असा अजब आणि आडमुठा दावा एनटीएच्या प्रमुखांनी केलाय...संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं... पाहूयात...
NEETNEET पेपरफुटीशी NTAचा कुठलाही संबंध नसून NEETचा पेपर फुटलाच नाही असा दावा संसदीय समितीपुढे NTAच्या महासंचालकांनी केला... त्यावेळी पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत समितीतील सदस्य खासदारांनी प्रश्न विचारले. NTAनं पेपरफुटी रोखण्यासाठी 70 टक्के उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचं NTAचं स्पष्टीकरण...
त्यामुळे जर प्रश्नपत्रिका फुटलीच नव्हती, तर परीक्षा रद्द का करण्यात आली? फेरपरीक्षेची काय गरज होती? असा सवाल संसदीय समितीने महासंचालकांना केला...मात्र त्यावर सिंग यांनी समितीला उत्तर देणं टाळत सीबीआयकडे चौकशी सुरु असल्याचं सांगितलं... तसंच जोपर्यंत CBI पेपरफुटीची पुष्टी करत नाही, तोपर्यंत ते याला पेपरफुटी मानणार नाही,अशी भूमिकाही NTAनं घेतली.
दुसरीकडे विरोधी पक्षातील सदस्यांनी सीबीआय चौकशीचा अहवाल समितीसमोर सादर करण्याची मागणी NTA चे महासंचालक अभिषेक सिंग यांच्याकडे केलीय..त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी त्याला आक्षेप घेत, सीबीआय ही स्वायत्त यंत्रणा असून त्यांना त्यांचे काम करण्याची मुभा द्यायला हवी, असं मत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...एकीकडे पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
तर दुसरीकडे ज्या संस्थेवर परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी आहे, तीच संस्था लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असताना आपले हात झटकून मोकळी कशी होऊ शकते? जर पेपर फुटलाच नव्हता, तर लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा लादून त्यांचा ताण का वाढवला? सीबीआय अहवालाच्या नावाखाली NTA नेमकं काय लपवू पाहतेय? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.