NEET पेपरफुटी प्रकरणावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संसदीय समितीसमोर एक अजब आणि धक्कादायक पवित्रा घेतला आहे."आमच्या सिस्टीममधून कोणताही पेपर फुटलेला नाही. जोपर्यंत सीबीआय (CBI) या गोष्टीची पुष्टी करत नाही, तोपर्यंत आम्ही हे मान्य करणार नाही," असा पवित्रा 'NTA'च्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
संसदीय समितीसमोर झालेल्या या बैठकीत 'NTA'च्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेण्यात आली. एनटीएच्या या दाव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत, "जर पेपर फुटलाच नव्हता, तर मग फेरपरीक्षा का घेण्यात आली?" असा थेट आणि तिखट सवाल उपस्थित केला. या गंभीर प्रश्नावर 'NTA'च्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संसदीय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.