NEET Paper Leak Case : NEET परीक्षेतील गैरप्रकारांची आता CBI करणार चौकशी; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!

NEET Paper Leak Case Latest Update : नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी यूजीसी-नेट परीक्षेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
NEET Paper Leak Case Latest Update
NEET Paper Leak Case Latest UpdateSaam TV
Published On

देशभरात सध्या नीट परीक्षेतील गैरप्रकारावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी यूजीसी-नेट परीक्षेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

NEET Paper Leak Case Latest Update
Anti-Paper Leak Law : मोठी बातमी! पेपर फोडणं आता पडणार महागात; केंद्र सरकारने मध्यरात्री लागू केला नवा कायदा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षा ५ मे २०२४ रोजी घेतली होती. या परीक्षेत काही अनियमिततेची प्रकरणे समोर आली आहेत. यावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांनी देखील सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

सर्वबाजूने कोंडी झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआय तसेच ईडीकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यानंतर केंद्राने शनिवारी रात्री जाहीर केले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET मधील कथित अनियमिततेचा तपास सीबीआयकडे सोपविला जाईल. दरम्यान, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवर केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.

पेपर फुटीविरोधात कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच एनटीएचे महासंचालक सुबोध सिंग यांना हटवण्यात आलं आहे. काही ठिकाणच्या नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर या प्रकरणात कोणत्या नवनवीन गोष्टी समोर येतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

NEET Paper Leak Case Latest Update
NEET Exam Paper Leak: पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही; पेपर फोडाल तर ५ वर्षं जेलमध्ये जाल, नवा कायदा लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com