नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

neet re exam : नीटच्या फेरपरीक्षेबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. NTA ने परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.
neet re exam update
neet re exam Saam tv
Published On
Summary

नीट फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट समोर आलीये

नीट फेरपरीक्षेची तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या

पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली 'NEET' फेरपरीक्षा आता २१ जून २०२६ रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा पार पडली होती; मात्र पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देशभरात सीबीआयकडून (CBI) धडक कारवाई करण्यात आली होती. यामध्ये नाशिक, पुणे, हरियाणा आणि दिल्लीसह देशभरातील पेपरफुटीचे मोठे जाळे उघडकीस आले होते. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तपासानंतर, सरकारने आता नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे

NTA च्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) भारत सरकारच्या मान्यतेने NEET (UG) २०२६ च्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता ही फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

neet re exam update
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्या

परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, परीक्षार्थी आणि पालकांनी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि माध्यमांवरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा शंकांसाठी उमेदवार neet-ug@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात.

पेपर फूट प्रकरणात लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक

तत्पूर्वी, नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातील विविध भागात कारवाई सुरू आहे. राजस्थानसहित महाराष्ट्रातील विविध भागात कारवाई सुरू आहे. राज्यातील लातूरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नीट पेपर फुट प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयने मोठा तपास सुरू केला आहे. पहाटेपासून आज पुन्हा एका खासगी क्लास चालकाची त्याच्या राहत्या घरून कसून चौकशी सुरू आहे. पी. व्ही कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. लातूरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या घरात सीबीआय तळ ठोकून आहे. सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून चौकशी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com