इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे संपूर्ण जगभरात पडसाद उमटत आहेत. या युद्धामुळे जगाची २ गटात विभागणी झाली आहे. या युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून बोलून त्यांच्या बाजूने भारत खंबीरपणे उभा आहे, असा संदेश दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली होती. यावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेनंतर एक्स अकाऊंटवर पोस्ट करत इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानापूर्वी जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंतच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत असेच विचार मी व्यक्त केले होते. या दोन्ही देशाच्या दीर्घकालीन वादावर तोडगा निघून शांतता आणि सौहार्द प्रस्थापित व्हावे हेच त्यातून सांगावयाचे होते. पंतप्रधान मोदी यांनी तेच अधोरेखित केले याबद्दल धन्यवाद'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'मला आशा आहे की, माझ्या विधानाचा विपर्यास करणाऱ्या काही भाजपा नेत्यांना अशा संवेदनशील विषयावर राष्ट्राची भूमिका लक्षात येईल. "राजापेक्षा अधिक निष्ठावंत' अशी एक इंग्रजी म्हण प्रचलित आहे. या टिप्पण्या त्याच धांदलीचा एक भाग आहेत, असे शरद पवार पुढे म्हणाले.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय भूमिका मांडली?
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, 'पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टिनी लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहू'.
'पॅलेस्टाईनमधील दहशतवाद, हिंसाचार आणि ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थितीबाबत तीव्र चिंता वाटते. या इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि त्यावरील ठरावांचे समर्थन केले, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.