भाजपची ताकद वाढणार; बडा नेता लवकरच पक्ष प्रवेश करणार? राजकीय चर्चांना उधाण

Punjab politics : पंजाबमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. कारण लवकरच एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Punjab political news
Punjab politics Saam tv
Published On
Summary

नवजोत कौर सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

काँग्रेसपासून सिद्धू कुटुंब दूर जात असल्याचे संकेत

नवजोत सिंह सिद्धू यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा

पंजाबच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसपासून दूर होत चाललेले नवजोत सिंह सिद्धू लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांची पत्नी आणि माजी आमदार डॉ. नवजोत कौर सिद्धू यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने डॉ. नवजोत कौर सिद्धू यांना निलंबित केलं. पक्षविरोधी वक्तव्ये केल्याने पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नवजोत कौर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

Punjab political news
ZP निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष; अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर, सामचा एक्झिट पोलचा अंदाज

काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नवजोत कौर सिद्धू यांनी थेट काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांना पप्पू म्हणत टीका देखील केली. काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यासाठी ५०० कोटी रुपयांची सुटकेस द्यावी लागते, अशी टीका त्यांनी केली. या टीकेनंतर काँग्रेसने नवजोत कौर यांना निलंबित केल्याचे समजतेय.

नवजोत सिंह सिद्धू लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सिद्धू हे याआधी देखील भाजपमध्ये होते. ते भाजपकडून अमृतसरचे खासदार होते. कालांतराने सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते.

Punjab political news
सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी ठरली गेमचेंजर! भारतानं अमेरिकेला नमवलं! टीम इंडियाची विजयी सलामी

नवजोत सिंह सिद्धू भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चांना अद्याप भाजपच्या नेत्यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. नवजोत कौर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत आहे की, त्यांच्या कुटुबीय काँग्रेसपासून दूर गेलं आहे. सिद्धू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसला मोठा धक्का मानला जाईल. या पक्षप्रवेशामुळे भाजपला पंजाबमध्ये मोठा चेहरा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com