

नवी दिल्ली : फेब्रवारी महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत पावसांच्या सरी कोसळल्याने देशातील काही भागातील वातावरण थंड आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये तापमानात हळू-हळू वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना एप्रिल ते जून महिन्यात उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागणार आहे. (Latest Marathi News)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम भारतातील काही भाग सोडला तर देशातील काही भागात एप्रिल ते जून महिन्यात तापमान हे सामन्य तापामानापेक्षा अधिक असणार आहे.
याचदरम्यान, उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व राज्यात उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तीन आणि चार एप्रिलला उत्तर पश्चिम भारतात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यापासून उष्णतेची लाट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये एप्रिलमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट सुरू होणार आहे. कमाल तापमानाहून ४.५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे.
उष्णतेची लाट किती डिग्री सेल्सियस असते?
खुल्या मैदानासारख्या भागात कमाल तापमान हे कमीत कमी ४० डिग्री सेल्सियस, किनारपट्टीत भागात ३७ डिग्री सेल्सियस असते. तर डोंगराळ भागात तापमान हे ३० डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचतं. यंदाचा उष्णतेची लाट अधिक दिवस राहण्याची शक्यता आहे .
एप्रिल महिन्यात पाऊस कोसळणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात सामान्य स्वरुपात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात देशभरात ३९.२ मिमि पाऊस होतो. उत्तर-पश्चिम, मध्यसहित अन्य खाही भागात सामान्य पावसापेक्षा अधिक पाऊस होतो. देशाच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भारतात कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.