

येवला वनविभागातील ८ कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले.
नाशिक जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.
प्रशासकीय वर्तुळात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अजय सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाणात वाढले आहे. प्रशासकीय विभागात वाढलेल्या या भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर करवाई करण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसापूर्वी पिंपळगाव बसवंत येथील एका हवालदाराला पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता येवला येथील वन विभागाच्या कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांना एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या कार्यालयातील ८ कर्मचाऱ्यांनी सागाच्या झाडं तोडण्याची परमिशन देण्यासाठी लाच मागितली होती. याप्रकरणी नासिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाई करत ८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. येवला वन विभागाच्या कार्यालयात एसीबीच्या पथकाने छापा मारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सागाची झाडं तोडण्यासाठी परवानगी देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. नाशिकच्या एसीबीने पथकाने ही कारवाई पोलीस निरीक्षक पुनम केदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे. पथकाने आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक पोलीस तपास सुरू आहे. या कर्मचाऱ्यांनी नेमकी किती रुपयांची लाच मागितली होती, याची माहिती अद्याप मिळाली नाहीये. कारवाई पूर्ण झाल्यावरच त्याबाबत अधिकृत माहिती हाती येईल.
दोन- तीन दिवसापूर्वी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपळगाव (बसवंत) पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले होते. संतोष राघो ब्राम्हणे (४४) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील आडगाव शिवार येथील रहिवासी आहेत. यातील मूळ तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज प्रलंबित होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार संतोष ब्राम्हणे याच्याकडे होता. या अर्जाच्या चौकशीत तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मदत करून त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात संतोष ब्राम्हणे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पिंपळगाव (बसवंत) पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.