Rahul Gandhi Vs Smriti Irani : नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींचे टार्गेट, पण मोदींचे टार्गेट...; स्मृती इराणी कडाडल्या

Smriti Irani Press Conference : मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला.
Smriti Irani Press Conference
Smriti Irani Press Conference SAAM TV

Rahul Gandhi Vs Smriti Irani Latest News : राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी आणि त्यावरून विरोधकांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका, राहुल गांधींना सरकारी निवासस्थान रिकामं करण्याची बजावलेली नोटीस या मुद्द्यांवरून भाजप विरुद्ध काँग्रेस आणि विरोधक असा सामना रंगला आहे. त्यात आज, मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदींची (Narendra Modi) प्रतिमा मलीन करण्यासाठी राहुल गांधी विदेश, देश आणि संसदेतही खोटं बोलले. संसदेत राहुल गांधी जे खोटे बोलले ते अख्ख्या देशानं ऐकलं. राहुल गांधी सुप्रीम कोर्टासमोर जाऊन माफी मागतात आणि आज ते ढोंग करत आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्याने ओबीसी समाजाचा अवमान केला, असंही स्मृती इराणी म्हणाल्या.

Smriti Irani Press Conference
Shinde and Fadanvis Press: शिंदे म्हणाले, वाचू का? फडणवीस म्हणाले, नाही गरज नाही... पत्रकार परिषद पुन्हा गाजली, पाहा व्हिडिओ

राहुल गांधी यांचे टार्गेट फक्त मोदी आहेत. पण मोदी यांचे टार्गेट फक्त आणि फक्त देशाचा विकास आहे, असंही स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल यांनी ४ मे २०१९ रोजी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर प्रहार करतच राहणार आहे. पण मोदींच्या प्रती असलेले प्रेम ते कमी करू शकले नाहीत. नरेंद्र मोदींचा अपमान करता करता संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान करणे राहुल गांधींना योग्य वाटले, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

नरेंद्र मोदींची प्रतिमा छिन्नविछिन्न करणे हेच एकमेव लक्ष्य राहुल गांधींचे आहे. त्यांना लोकशाहीशी काही देणंघेणं नाही. ओबीसी समाजाबद्दल त्यांच्या मनात अजिबात आदर नाही, असंही स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान रिकामं करण्यासंबंधीच्या नोटिशीबद्दल बोलताना, ते घर त्यांचे नाही, अशी प्रतिक्रिया इराणी यांनी दिली.

Smriti Irani Press Conference
Crime News : देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब! धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची धावपळ

युवा काँग्रेसच्या टिप्पणीला स्मृती इराणींचं उत्तर

युवा काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवरही स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली. शब्द राहुल गांधींचे आहेत, पण संस्कार सोनिया गांधींचे आहेत. फक्त तोंड युवा काँग्रेसचे आहे. युवा काँग्रेसने अभद्र टिप्पणी केल्याची ही पहिलीच वेळ नाही. जोपर्यंत पक्षात राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत, ज्या नेत्याला बढती हवीय ते नेते माझ्यावर अशाच प्रकारची टिप्पणी करत राहतील, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com