Shinde and Fadanvis Press: शिंदे म्हणाले, वाचू का? फडणवीस म्हणाले, नाही गरज नाही... पत्रकार परिषद पुन्हा गाजली, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
CM Eknath Shinde and Devendra Fadanvis Press
CM Eknath Shinde and Devendra Fadanvis Presssaam tv
Published On

CM Eknath Shinde and Devendra Fadanvis Press: मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्र परिषदेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक पत्रक वाचताना शिंदे थोडे चाचपडताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी फडणवीसांना वाचू का? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी 'नाही काही गरज नाही' असे उत्तर दिले.

आता दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर झाली आणि ती कॅमेऱ्यात कैदही झाली. या शिंदे-फडणवीसांच्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी यावरून शिंदेंना टोला लगावला आहे.

CM Eknath Shinde and Devendra Fadanvis Press
Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब! धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची धावपळ

'आता झाले ना ९ महिने!'

आंबादास दानवे म्हणाले, 'आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही 'सुपर सीएम'च लागतात का तुम्हाला? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे!' असे ट्वीट दानवे यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग देखील केले आहे.

'दोन वाक्य व्यवस्थित बोलू शकत नाही'

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील या पत्रकार परिषदेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, भाजप, संघ आणि सावरकरांचा काही संबंध नाही. संघ परिवाराने सावरकरांना कायम आपले शत्रु मानले आणि वाळीत टाकले. काल मुख्यमंत्री वीर सावरकर यात्रेसंदर्भात घोषणा करताना सावरकरांविषयी दोन वाक्य व्यवस्थित बोलू शकत नव्हते, असे राऊत म्हणाले. (Maharashtra Politics)

CM Eknath Shinde and Devendra Fadanvis Press
Sharad Pawar On Savarkar Dispute: सावरकर वादात शरद पवारांची मध्यस्थी, राहुल गांधी यापुढे सावरकरांचा मुद्दा टाळणार?

'यालाच गुलामी म्हणतात'

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री समोर असलेला कागद वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात सावरकर आहे, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदना द्यायला हवी होती. पण ते उपमुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामी विरुद्ध सावरकरांनी आपलं अख्ख आयुष्य अंदमानात घालवलं हे राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे असे म्हणत राऊतांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com