Naib Singh Saini : नायब सिंग सैनी यांनी घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; मनोहर लाल खट्टर देखील उपस्थित

Haryana Politics/Manohar Lal Khattar : भाजपचे अध्यक्ष नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगड येथे हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरदेखील उपस्थित होते.
Naib Singh Saini
Naib Singh SainiSaam Digital

Naib Singh Saini

भाजपचे अध्यक्ष नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगड येथे हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरदेखील उपस्थित होते. मनोहर लाल खट्टर निवडून आल्यानंतर हरियाणात राजकीय भूकंप आला होता. त्यानंतर खट्टर यांचे निकटवर्तीय असलेले नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या, अखेर काही तासातच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

कोण आहेत नायब सिंह सैनी

नायब सिंह सैनी हे हरियाणा भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. नायब सिंह सैनी हे ओबीसी चेहरा आहेत. वर्ष २००५ मध्ये नायब सिंह हे भाजपच्या युवा मोर्चाचे अंबाला जिल्हा अध्यक्ष बनले होते. यानंतर २००९ मध्ये भाजप किसान मोर्चा हरियाणाचे सचिव झाले. त्यानतंर २०१२ मध्ये अंबाला भाजप जिल्हा अध्यक्ष बनले. २०१४ मध्ये नारायण गढ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. २०१६ मध्ये हरियाणा सरकारमध्ये राज्य मंत्री बनले आणि वर्ष २०१९ कुरूक्षेत्राचे खासदार बनले होते.

Naib Singh Saini
Congress 2nd List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी केली जाहीर, 43 उमेदवारांना दिलं तिकीट

खट्टर यांचे निकटवर्तीय आहेत नायब सिंह सैनी

नायब सिंह सैनी हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्तीय आहेत. त्याच्याच फायदा त्यांना झालाय. वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरने सैनी यांना हरियाण सरकारमध्ये राज्यमंत्री बनवलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते २०२३ मध्ये हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. नायब सिंह सैनी ओबीसी समाजाचे नेते आहेत. हरियाणामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवलं असल्याची चर्चा आहे.

Naib Singh Saini
Who Is Mukhtar Ansari: बाहुबली नेता ते कुख्यात गुंड; ३५ वर्षांपुर्वीच्या प्रकरणात कोर्ट सुनावणार शिक्षा; कोण आहे मुख्तार अन्सारी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com