Who Is Mukhtar Ansari: बाहुबली नेता ते कुख्यात गुंड; ३५ वर्षांपुर्वीच्या प्रकरणात कोर्ट सुनावणार शिक्षा; कोण आहे मुख्तार अन्सारी?

Mukhtar Ansari Found Guilty: मुख्तार अन्सारी याच्यावर डीएम आणि एसपींच्या खोट्या सह्या करून परवाना मिळवल्याचा आरोप होता. बांदा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाच्या सुनावणीत मुख्तार अन्सारी सहभागी झाला होता.
Who Is Mukhatar Ansari:
Who Is Mukhatar Ansari: Saamtv
Published On

Mukhtar Ansari News:

कुप्रसिद्ध डॉन मुख्तार अन्सारी याला शस्त्र परवाना फसवणूक प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. वाराणसीच्या आमदार- खासदार विशेष न्यायालयात बुधवारी यावर शिक्षा सुनावली जाणार आहे. हे प्रकरण 36 वर्ष जुन्या बनावट बंदूक परवान्याशी संबंधित आहे. यामध्ये मुख्तार अन्सारी याच्यावर डीएम आणि एसपींच्या खोट्या सह्या करून परवाना मिळवल्याचा आरोप होता. बांदा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाच्या सुनावणीत मुख्तार अन्सारी सहभागी झाला होता.

विशेष न्यायाधीश अवनीश कुमार गौतम यांच्या न्यायालयात 27 फेब्रुवारी रोजी शेवटची सुनावणी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने 12 मार्च रोजी निकाल देण्याचे ठरवले होते. मात्र आज न्यायालयाने मुख्तारला दोषी घोषित केले असून उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

4 डिसेंबर 1990 रोजी तत्कालीन उपजिल्हाधिकारी मुख्तार अन्सारी यांच्यासह 5 नावाजलेल्या आणि अनोळखी व्यक्तींविरुद्ध मुहम्मदाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान गौरीशंकर श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात माजी सीएस आलोक रंजन आणि माजी डीजीपी देवराज नागर यांनीही त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Mukhatar Ansari:
Chandrapur : काेणत्या दबावाला बळी पडणार नाही, आमचा लढा सुरूच ठेवणार; मुख्यमंत्र्यांना इशारा देणारे देशमूख स्थानबद्ध

या प्रकरणात माजी मुख्य सचिव आणि माजी डीजीपी यांचीही साक्ष होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारीवर 10 जून 1987 रोजी बनावट कागदपत्रांच्या आधारे डबल बॅरल बंदुकीचा परवाना घेतल्याचा आरोप आहे.

कोण आहे मुख्तार अन्सारी?

मुख्तार अन्सारी हा एक भारतीय माफिया-डॉन आणि उत्तर प्रदेशातील दबंग राजकारणी आहे. पूर्वांचलच्या गुन्हेगारी जगतातील मुख्तार अन्सारी हे कुख्यात नाव आहे. 60हून अधिक हत्येच्या प्रकरणात त्याचं नाव आहे. मुख्तार अन्सारी मऊ सदरचे पाच वेळा आमदार आहे. (Latest Marathi News)

Who Is Mukhatar Ansari:
Ulhasnagar News : क्षुल्लक कारणावरून दोन व्यापारी भावांना मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com