Nayab Singh Saini: हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार नायब सैनी; कोण आहेत नायबसिंह सैनी?

Who is Nayab Singh Saini: नायब सिंह सैनी ओबीसी समाजाचे नेते आहेत. हरियाणामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवलं असल्याची चर्चा आहे.
Who is Nayab Singh Saini
Who is Nayab Singh Sainisaam Tv
Published On

Who is Nayab Singh Saini:

भाजप आणि जेजेपीमधील मतभेदामुळे हरियाणाच्या राजकारणात भूकंप आला. या भूकंपामुळे मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. आता नव्याने हरियाणामध्ये नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यात आलीय. खट्टर यांचे निकटवर्तीय असलेले नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. नायब सिंह सैनी हे भाजप अध्यक्ष होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Latest News)

कोण आहेत नायब सिंह सैनी

नायब सिंह सैनी हे हरियाणा भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. नायब सिंह सैनी हे ओबीसी चेहरा आहेत. वर्ष २००५ मध्ये नायब सिंह हे भाजपच्या युवा मोर्चाचे अंबाला जिल्हा अध्यक्ष बनले होते. यानंतर २००९ मध्ये भाजप किसान मोर्चा हरियाणाचे सचिव झाले. त्यानतंर २०१२ मध्ये अंबाला भाजप जिल्हा अध्यक्ष बनले. २०१४ मध्ये नारायण गढ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. २०१६ मध्ये हरियाणा सरकारमध्ये राज्य मंत्री बनले आणि वर्ष २०१९ कुरूक्षेत्राचे खासदार बनले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खट्टर यांचे निकटवर्तीय आहेत नायब सिंह सैनी

नायब सिंह सैनी हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्तीय आहेत. त्याच्याच फायदा त्यांना झालाय. वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरने सैनी यांना हरियाण सरकारमध्ये राज्यमंत्री बनवलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते २०२३ मध्ये हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. नायब सिंह सैनी ओबीसी समाजाचे नेते आहेत. हरियाणामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवलं असल्याची चर्चा आहे.

Who is Nayab Singh Saini
Haryana Politics : मोठी बातमी! हरियाणात संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com