Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये भयंकर भुकंपाचे हादरे; आतापर्यंत २०५६ लोकांचा मृत्यू, ३ हजारांहून अधिक जखमी; जग सुन्न

Myanmar Earthquake Update News : म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर सेलच्या विनाशकारी भुकंपामुळे ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबले गेले. त्यांचे बचावकार्य सध्या सुरु आहे.
myanmar earthquake updates news more than 2 thousand people died
myanmar earthquake updates news more than 2 thousand people died Saam Tv News
Published On

म्यानमारमध्ये झालेल्या भुकंपातील मृतांचा आकडा आता सुन्न करणारा आहे. येथील मृतांचा आकडा तब्बल २ हजार ५६ वर पोहोचला आहे. तर ३ हजारांपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत आणि सुमारे २७० लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारमधील सत्ताधारी जुंटा सरकारने आज सोमवारी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. भुकंप इतका भीषण होता की, सारंच उद्ध्वस्त झालं आहे.

म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर सेलच्या विनाशकारी भुकंपामुळे ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबले गेले. त्यांचे बचावकार्य सध्या सुरु आहे. या प्रलयात मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सध्या एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर येथील नागरिक या हादऱ्यातून अद्याप सावरलेले नाहीत. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडाले येथील ग्रेट वॉल हॉटेलच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तीन दिवसांनंतर कोणीतरी व्यक्ती जिवंत सापडल्याने लोक वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. म्यानमारमधील चिनी दुतावासाने त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

myanmar earthquake updates news more than 2 thousand people died
Beed News : जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून मारण्याचा प्लॅन आखला, वाल्मिक कराडवर मीरा गितेंचा गंभीर आरोप

म्यानमारमधील भूकंपाच्या केंद्राजवळ असणाऱ्या मंडाले येथे हा भूकंप झाला, ज्याचे धक्के थायलंडसह शेजारील इतर देशालाही बसले आहेत. परिणामी राजधानी बँकॉकसह अनेक भागात नुकसान झाले असल्याचं बातमी आता समोर आली आहे. बँकॉकमध्ये बांधकाम सुरु असलेली गगनचुंबी इमारत जमीनदोस्त झाली. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७६ लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. भूकंपाच्या धक्क्यामुळे या इमारतीची रचना कोसळली. दुसरीकडे काल रविवारपर्यंत थायलंडमध्ये मृतांची संख्या १८ होती जी आणखी वाढण्याची भीती आहे.

myanmar earthquake updates news more than 2 thousand people died
MI vs KKR: अश्वनीच्या चक्रव्यूहात अडकला KKR चा संघ; मुंबईसमोर ११७ धावांचे माफक आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com