
मुंबईचा जलदगती गोलंदाज अश्वनी कुमारच्या भेदक माऱ्यापुढे कोलकता संघाने नांगी टाकली. सुरुवातीपासून केकेआरची पडझड पाहायला मिळाली. रडत खडत कोलकता संघाने १६ षटकात ११६ धावा करत मुंबईसमोर अवघे ११७ धावांचे आव्हान दिले.
नाणेफेक मुंबईने जिंकली होती. हार्दिक पांड्याने फलंदाजी न घेता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात खराब राहिली. कोलकाताचा दमदार खेळाडू नरेनने पहिल्याच षटकात बाद झाला. तर दुसऱ्याच षटकात दीपक चहरने क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही आपल्या कामगिरीने निराश केलं. रहाणे ७ चेंडूत ११ धावा काढत अश्वनी कुमारचा बळी ठरला. मुंबईकडून अश्वनी कुमारने ४ विकेट घेतल्या.
इतकेच काय २३.७५ कोटींना विकला गेलेला व्यंकटेश अय्यरही काही खास कमाल आज दाखवू शकला नाही. ९ चेंडूंचा सामना करत त्याने केवळ ३ धावा केल्या. त्याला दीपक चहरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात 18 व्या हंगामातील 12 वा सामना खेळला जातोय.
पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी विजेता असललेल्या मुंबई संघ पहिला विजयाच्या शोधत आहे. या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अश्विनी कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. अश्विनीने या सामन्यात ४ विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. केकेआरचा निम्मा संघ अवघ्या ४५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने भेदक गोलंदाजी केली. पहिल्याच आयपीएल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. केकेआरने पॉवरप्लेच्या अवघ्या ६ षटकांत ४ विकेट गमावल्या. त्यावेळी संघाची धावसंख्या ४१ होती.
कोलकताचा अंगकृष्ण रघुवंशी याने १६ चेंडूत २६ धावा केल्या. मात्र तोही हार्दिक पांड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. खालच्या फळीतील फलंदाजांनाही विशेष काही करता आले नाही. मनीष पांडेने १४ चेंडूत १९ धावा केल्या, मात्र तोही अश्वनी कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.