Earthquake Video: भूकंपाचे जोरदार धक्के, हॉस्पिटल हादरले; बाळांचा जीव वाचवण्यासाठी नर्सने लावली जीवाची बाजी, पाहा थरारक VIDEO

China Earthquake Viral Video: म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के चीनमध्ये देखील जाणवले. चीनमधील एका रुग्णालयातील थरारक व्हिडीओ समोर आला असून तो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दोन नर्स बाळांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Earthquake Viral Video: भूकंपाचे जोरदार धक्के, हॉस्पिटल हादरले; बाळांचा जीव वाचवण्यासाठी नर्सने लावली जीवाची बाजी, पाहा थरारक VIDEO
China Earthquake Viral VideoSaam Tv
Published On

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत १,६४४ ​​नागरिकांचा मृत्यू झाला. या भूकंपामुळे ३,४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. थायलंड, चीन, भारत, व्हिएतनाम आणि बांगलादेशसह अनेक शेजारील देशांमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये मोठे नुकसान झाले. मोठ्याप्रमाणात जीवितहानीसोबत वित्तहानी देखील झाली. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भूकंपाचे धक्के चीनमध्येही जाणवले त्याठिकाणच्या एका हॉस्पिटलमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी रुग्णालयातील नर्सचे कौतुक करत आहेत.

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के चीनमध्ये जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे चीनमधील एका रुग्णालयाची इमारत जोरदार हादरली. चीनमधील युनानमधील हे रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या व्हिडिमध्ये दोन प्रसूती वॉर्डमधील नर्स नवजात बालकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. आपला जीव धोक्यात घालत या दोन्ही नर्स नवजात बाळांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये ६ बाळांना पाळण्यात ठेवण्यात आले आहे. एका नर्सने हातात बाळाला घेतलं आहे. त्याचवेळी अचानक भूकंपाचे जोरदार धक्के जाणवू लागतात. समुद्रात बोटीमध्ये वादळामध्ये साडलेली बोट ज्याप्रमाणे हालते त्यामध्ये हा वॉर्ड रूम हादरताना दिसत आहे. या वॉर्डमध्ये बाळांना ठेवण्यात आलेले पाळणे इकडे तिकडे होताना दिसत आहे. या बाळांना वाचवण्यासाठी एक नर्स सर्व पाळणे जवळ घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करते पण धक्केच ऐवढे जोरात होते की पाळणे दूर जात होते. तर दुसरी नर्स जमिनीवर बसून एका बाळाचे संरक्षण करत आहे.

भूकंपाच्या धक्क्यामुळे वॉर्डमधील पाण्याचे फिल्टर जोरात हलू लागले आणि त्यामधील पाणी जमिनीवर साडते. जमीन ओली झाल्यामुळे पाय घसरत होते. असे असताना ओल्या जमिनीवर तोल राखण्यासाठी आणि बाळांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी दोन्ही नर्सनी खूप प्रयत्न केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी या दोन्ही नर्सचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com