Love marriage : प्रेमासाठी सद्दाम झाला शिव शंकर, हिंदू प्रेयसीसोबत मंदिरात केलं लग्न

UP News, Love Beyond Boundaries : एका मुस्लिम तरूणाने प्रेमासाठी आपले नाव आणि धर्म बदललाय. रीती-रिवाजप्रमाणे मंदिरात दोघांनी लग्न केलेय. जिल्ह्यात या लग्नाची चर्चा होत आहे.
Love marriage : प्रेमासाठी सद्दाम झाला शिव शंकर, हिंदू प्रेयसीसोबत मंदिरात केलं लग्न
Love marriagesaam tv
Published On

Basti Hindu Muslim Marriage : आतापर्यंत आपण प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेली जोडपी पाहिली. त्यांच्या अंर्तमुख करणाऱ्या प्रेमकहाणीमुळे पुन्हा एकदा आपलं निर्मळ प्रेमावर विश्वास बसतो. उत्तर प्रेदशमध्ये प्रेमात धर्म बदलल्याचा प्रकार समोर आलाय. बस्ती जिल्ह्यातील एका मुस्लिम युवकाने प्रेमासाठी धर्म बदलला. प्रेयसी अनु सोनीसाठी सद्दामने हिंदू धर्म स्वीकारला. दोघांनी हिंदू परंपरेप्रमाणे लग्न केले. सद्दामने आपले नाव बदलून शिव शंकर सोनी असे केलेय. बस्तीमध्ये सद्दाम आणि अनु यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे.

बस्ती जिल्ह्यातील एका मुस्लिम तरूणाने प्रेमासाठी आपले नाव आणि धर्म बदललाय. रीती-रिवाजप्रमाणे मंदिरात दोघांनी लग्न केलेय. बस्तीमधील नगर येथे राहणारा सद्दाम अनू सोनी हिच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रेम सुरू होतं. पण धर्म वेगवेगळे असल्यामुळे अडचण येत होती. अखेर सद्दाम प्रेमासाठी आपला धर्म आणि नाव बदलण्याचा निर्णय घेतल. त्यानं हिंदू धर्म स्वीकराला अन् आपले नाव शिवशंकर सोनी केलं. दोघांनी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे शंकराच्या मंदिरात लगीन गाठ बांधली. प्रेमासाठी धर्म आणि नाव बदलणाऱ्या सद्दाम उर्फ शिव शंकर याची बस्ती जिल्ह्यात चर्चा आहे.

Love marriage : प्रेमासाठी सद्दाम झाला शिव शंकर, हिंदू प्रेयसीसोबत मंदिरात केलं लग्न
Pune : 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार, डॉक्टर तरुणीनं क्लिनिकमध्येच आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

सद्दामशी त्यांनी नातं तोडलं -

सद्दाम आणि अनु दहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. त्यांच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीपासून झाली. अनु आणि सद्दाम यांनी कोणत्याही परिस्थितीत सोबतच राहण्याचं ठरवलं. सद्दामच्या कुटुंबियांनी अनु सोनीला स्वीकारण्यास नकार दिला. सद्दाम तरीही अनुसोबत लग्न करण्यावर ठाम होता, त्यामुळे कुटुंबियांनी त्याच्यासोबतचं नातं तोडलं. कुटुंबियांनी सद्दामला घराबाहेर काढलं होतं.

Love marriage : प्रेमासाठी सद्दाम झाला शिव शंकर, हिंदू प्रेयसीसोबत मंदिरात केलं लग्न
प्रेमात गुलिगत धोका, कंपनीच्या मालकिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नही केलं, ५ कोटी घेतलं अन् धूम ठोकली

अनु सोनीची पोलिसात तक्रार -

सद्दाम एकवेळ कुटुंबाच्या दबावात आला, त्यानं अनुला लग्नास नकार दिला. अनुने रागाच्या भरात पोलिसात तक्रार दिली होती. पण त्यानंतर दोघांनी मिळून मार्ग काढला. सद्दामने मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रविवारी हिंदु रिती रिवाजाप्रमाणे लग्न केलं. उत्तर प्रदेशमध्ये याची चर्चा होत आहे.

Love marriage : प्रेमासाठी सद्दाम झाला शिव शंकर, हिंदू प्रेयसीसोबत मंदिरात केलं लग्न
Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com