Political News: खासदाराला कोर्टाकडून मोठा झटका, घर जप्त करण्याचे दिले आदेश

MP Chandrashekhar Azad: उत्तर प्रदेशातील खासदार चंद्रशेखर आझाद यांना कोर्टाने मोठा झटका दिला. त्याचे घर जप्त करण्याचे आदशे दिले आहे.
Political News: खासदाराला कोर्टाकडून मोठा झटका, घर जप्त करण्याचे दिले आदेश
MP Chandrashekhar AzadSaam Tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना कोर्टाने मोठा झटका दिला. एमपी-एमएलए कोर्टाने त्यांचे घर जप्त करण्याचे आदेश दिले. १७ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान हजर न राहिल्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. कोर्टाने खासदाराचे घर जप्त करण्याचे आदेश दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०१८ मधील आहे. गाझियाबादच्या साहिबाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन गार्डन येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या हल्ला आणि शाब्दिक गैरवर्तनाच्या घटनेशी हे प्रकरण संबंधित आहे. धर्मेंद्र कुमार यांनी या प्रकरणी तक्रार दाकल केली होती.

Political News: खासदाराला कोर्टाकडून मोठा झटका, घर जप्त करण्याचे दिले आदेश
Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रशेखर आझाद मुंबईतील संसदीय कामकाज समितीच्या नियोजित बैठकीला गैरहजर राहिले आणि न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या वकिलाने उपस्थितीतून सूट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. पण कोर्टाने थेट कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

Political News: खासदाराला कोर्टाकडून मोठा झटका, घर जप्त करण्याचे दिले आदेश
Maharashtra Politics: राज्यातील राजकरणात मोठी घडामोड; भाजपच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.