Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला

Pratiksha Nagar Fire: मुंबईच्या सायन परिसरात पोलिस वासहतीमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ ३ सिलिंडरचा स्फोट होऊन ४ घरं जळून खाक झाली.
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला
Mumbai FireSaam Tv
Published On: 

मुंबईमध्ये आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मुंबईच्या प्रतीक्षा नगर पोलिस वसाहतीमध्ये रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. L5 इमारतीमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट होऊ आग लागली. एकापाठोपाठ ३ सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण आगीमध्ये ४ घरं जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये सिलिंडर स्फोटांची घटना घडली. एकापाठोपाठ ३ सिलिंडरचे स्फोट झाले. सिलिंडर स्फोटामुळे प्रतीक्षा नगर परिसरात झोपड्यांना आग लागली. माला गार्डनजवळील पोलिस वसाहतीतील L5 इमारतीत ही घटना घडली. या स्फोटानंतर परिसरातील ४ झोपड्यांना देखील आग लागली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला
Garment Factory Fire: दिवाळीच्याच दिवशी गारमेंट फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून लेव्हल-1 ची आग घोषित करण्यात आली होती. या घटनेनंतर वडाळा टीटी पोलिस, बीएमसी कर्मचारी, बेस्ट आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला. या जवानाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला
Fire Tragedy : मध्यरात्री भीषण अग्नितांडव! एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटामुळे प्रतीक्षानगरचा संपूर्ण परिसर हादरून निघाला. या आगीमुळे परिसरात खळबळ पसरली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या सिलिंडर स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. पण ४ घरं जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान झालं.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.