Mozambique Boat Sank : १३० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं; ९० हून अधिक जणांचा मृत्यू , मदत कार्य सुरु

Mozambique Boat Sank latest Update : दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. या देशाच्या उत्तरेच्या समुद्री किनाऱ्याजवळ एक जहाज बुजण्याचा घटना घडली आहे.
Mozambique Boat
Mozambique Boat Saam tv

Mozambique Boat Sank :

दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. या देशाच्या उत्तरेच्या समुद्री किनाऱ्याजवळ एक जहाज बुजण्याचा घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत ९१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने या देशात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातील किनारपट्टीजवळील समुद्रात नामपुला प्रोविंस नावाचं जहाज आयलँडच्या दिशेने जात होतं. मात्र, त्याचवेळी दुर्दैवी घटना घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'या जहाजामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. हे जहाज देखील प्रवाशांसाठी ने-आण करण्यासाठी अनफिट होतं. या घटनेतील मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेत बुडालेल्या प्रवाशांपैकी ५ जणांना वाचविण्यात यश आहे. बचाव पथकांकडून इतर प्रवाशांना मदतकार्य सुरु आहे.

Mozambique Boat
Jharkhand News: ऐकावं ते नवलंच! उंदरांनी फस्त केलं १०किलो भांग आणि ९ किलो गांजा; पोलिसांच्या उत्तराने न्यायाधीश आवाक

अपघाताला कॉलरा आजार जबाबदार

या दुर्दैवी घटनेला कॉलराचा अपघात जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोजांबिकमध्ये कॉलराचा आजाराचे एकूण १५ हजारांपर्यंत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या देशातील लोक स्थलांतर करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काबो डेलगोडोमध्ये दहशतवाद्यांपासून जीव वाचण्यासाठी लोकांचं स्थलांतर सुरु आहे.

Mozambique Boat
PM मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, एकमेकांवर पडले कार्यकर्ते; VIDEO

दरम्यान, बचाव पथकाने वाचवलेल्या ५ जणांपैकी २ जणांवर उपचार सुरु आहेत. हे जहाज आयलँडच्या दिशेने जात होतं. या आयलँडला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं आहे. या आयलँडचा शोध वास्को दि गामा यांनी केला होता. मोजांबिकमधील लोकांना चक्रीवादळाचाही सामना करावा लागतो. या देशातील लोकांमध्ये गरिबी देखील भरपूर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com