Jharkhand News: ऐकावं ते नवलंच! उंदरांनी फस्त केलं १०किलो भांग आणि ९ किलो गांजा; पोलिसांच्या उत्तराने न्यायाधीश आवाक

Jharkhand Police : न्यायालयाने आरोपींकडून जप्त केलेले अमली पदार्थ शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचे तपास अधिकारी जयप्रकाश प्रसाद न्यायालयात पोहोचले मात्र त्यांच्याकडे आरोपींकडून जप्त केलेला गांजा नव्हता, एक विचित्र उत्तर होतं, नेमकं काय आहे हा प्रकार जाणून घेऊ..
Jharkhand News: ऐकावं ते नवलंच! उंदरांनी फस्त केलं १०किलो भांग आणि ९ किलो गांजा; पोलिसांच्या उत्तराने न्यायाधीश आवाक
Jharkhand Policeyandex

Rats eats Cannabis In Jharkhand :

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींकडून जाबाज पोलिसांनी ९ किलो गांजा आणि १० भांग जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थांचा माल न्यायाधीशांनी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. पण पोलिसांकडे आरोपींकडून जप्त केलेले अमली पदार्थच नव्हते. पोलिसांकडे अमली पदार्थ का नाही, असा प्रश्न जेव्हा न्यायाधीशांनी केला. त्यावेळी पोलिसांनी दिलेलं उत्तर ऐकून न्यायालयातील अनेकांना डोक्याला हात मारून घ्यावे लागले तर न्यायाधीश सुद्धा आश्चर्यचकित झालेत. (Latest News)

ही काहणी एखाद्या सिनेमात घडली असेल असं वाटलं असेल, परंतु ही घटना घडलीय झारखंडमध्ये. झारखंडमध्ये पोलीस ठाण्याच्या गोदामात ठेवलेला १० किलो गांजा आणि 9९ किलो गांजा उंदरांनी फस्त केलाय. पोलिसांनी ६ एप्रिल रोजी न्यायालयात ही माहिती दिली. आता पोलिसांच्या या वक्तव्याने न्यायाधीशही हैराण झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या अंमली पदार्थासाठी पोलिसांनी पिता-पुत्रांना अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून अटक करून न्यायालयात हजर केले होते. अमली पदार्थच तपास यंत्रणा न्यायालयात हजर करू शकले नाहीत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार,हे प्रकरण धनबादच्या राजगंज पोलीस ठाण्यातील आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, १४ डिसेंबर २०१८ रोजी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे छापा टाकून शंभूप्रसाद अग्रवाल आणि त्यांच्या मुलाला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून १०किलो गांजा आणि ९ किलो गांजा जप्त केला.

हे प्रकरण कोर्टात पोहोचले तेव्हापासून कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अनेक तारखांवर सुनावणी झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींकडून जप्त केलेले अमली पदार्थ न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचे तपास अधिकारी जयप्रकाश प्रसाद न्यायालयात पोहोचले

मात्र त्यांच्याकडे आरोपींकडून जप्त केलेला गांजा नव्हता. कोर्टाने याचे कारण विचारले असता पोलीस कर्मचाऱ्याने विचित्र उत्तर दिले, ज्यावर संपूर्ण कोर्ट रूम हसू लागले. पोलीस स्टेशनच्या स्टोअररूममध्ये ठेवलेली सर्व औषधे उंदरांनी नष्ट करून ती खाल्ल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

Jharkhand News: ऐकावं ते नवलंच! उंदरांनी फस्त केलं १०किलो भांग आणि ९ किलो गांजा; पोलिसांच्या उत्तराने न्यायाधीश आवाक
Video Viral: दिल्ली मेट्रोत तैनात असलेल्या महाराष्ट्राच्या CISF जवानाने स्वतःवर झाडली गोळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com