Video Viral: दिल्ली मेट्रोत तैनात असलेल्या महाराष्ट्राच्या CISF जवानाने स्वतःवर झाडली गोळी

CISF Jawan: ही घटना दिल्लीच्या पश्चिम विहार पश्चिम मेट्रो स्टेशनमध्ये घडलीय. येथील मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या एका CISF जवानाने आत्महत्या केलीय. हा जवान २०२२ पासून दिल्ली मेट्रोमध्ये तैनात होता.
 CISF jawan Killed
CISF jawan KilledX

Maharashatra CISF jawan Killed Shoots Himself:

दिल्ली मेट्रो कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. दिल्ली मेट्रोशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना पश्चिम विहार मेट्रो स्थानकावर घडलीय. (Latest News)

हा व्हिडिओ सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म एक्सवर @MithilaWaala नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. यूजर आयडीवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, यामध्ये एक सीआयएसएफ जवान कर्तव्यावर बसलेला दिसत आहे. तो त्याची रायफल त्याच्या कपाळावर लावतो आणि ट्रिगर खेचत गोळी स्वतःवर गोळी झाडतो. यानंतर एक शिपाई तिथे येतो आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावतो. यानंतर व्हिडिओमध्ये गोंधळ दिसून येतो.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या पश्चिम विहार पश्चिम मेट्रो स्टेशनमध्ये घडलीय. येथील मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या एका CISF जवानाने आत्महत्या केलीय. हा जवान २०२२ पासून दिल्ली मेट्रोमध्ये तैनात होता. या जवानाने त्याच्या सर्व्हिस राफेलने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झालाय. सहारे किशोर असे मृत जवानाचे नाव असून तो महाराष्ट्रातील गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्याने आत्महत्या काल केली यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केलाय.

एसआरपीएफच्या जवानाची आत्महत्या

नागपूरमध्ये एसआरपीएफच्या (SRPF) जवानाने आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. वाडी पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी ही घटना घडली आहे. मंगेश मस्की, असं आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचं नाव आहे. तो सुराबर्डी येथील युओटीसी केंद्रात कार्यरत होता. एसएलआरने एक राउंड फायर केल्यामुळे या जवानाच्या डोक्यातून गोळी आरपार गेली. त्यामुळे या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय.

 CISF jawan Killed
Crime News: एसआरपीएफच्या जवानाची आत्महत्या; नागपूरमधील धक्कदायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com