Crime News: एसआरपीएफच्या जवानाची आत्महत्या; नागपूरमधील धक्कदायक घटना

SRPF Jawan End Life: नागपूरमध्ये एसआरपीएफच्या जवानाने आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं आहे.
Crime News
SRPF Jawan End LifeSaam Tv
Published On

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

SRPF Jawan End Life In Nagpur

नागपूरमध्ये एसआरपीएफच्या (SRPF) जवानाने आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून (Firing SLR) जीवन संपवलं आहे. एसएलआरने फायर करून एसआरपीएफ ग्रुप नं. ४ च्या ड्रील इन्स्पेक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. (Latest Crime News)

वाडी पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी ही घटना घडली (Crime News) आहे. मंगेश मस्की, असं आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचं नाव आहे. तो सुराबर्डी येथील युओटीसी केंद्रात कार्यरत (SRPF Jawan End Life) होता. कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असून त्याची पत्नीही वाडी पोलिस ठाण्यात आहे कार्यरत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसएलआरने एक राउंड फायर केल्यामुळे या जवानाच्या डोक्यातून गोळी आरपार गेली. त्यामुळे या जवानाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात (Nagpur Crime News) आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. घटनास्थळी

घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येच्या कारणाचा वाडी पोलीस घेत आहेत. पुढील तपास करण्यात येत (Nagpur Crime) आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे या जवानाने असं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलीस कारणाचा शोध घेत आहेत.

Crime News
Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

पुण्यातील घटना

पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने ५ एप्रिल रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने (End Life) आत्महत्या केल्याची घटना ५ तारखेला घडली (Crime News) होती. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. भारत दत्ता अस्मर, असं पुण्यात आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

Crime News
Akola Crime News: अकोल्यात चालंलय तरी काय? कारागृह निरीक्षकाला कॉलर पकडून बंदुकीनं उडवण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com