Crime News in Marathi: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याला इन्स्टाग्राम रील्स बनवण्याच इतकं वेड लागलं होत की त्यांनी चक्क आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकल्याची घटना घडली आहे. जोडप्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना रील बनवण्यासाठी आयफोन 14 घ्यायचा होता, म्हणून त्यांनी स्वतःचं बाळ विकलं आहे.
ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली असून बाळाचे वडील जयदेव फरार होते, पण त्यालाही अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही (Social Media) लोक या जोडप्यावर संताप व्यक्त करत आहेत. शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचं कबूल केलं.
शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि वडिलांना अटक केली. खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. याप्रकरणी प्रियंका नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)
शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील अंमली पदार्थांचे सेवन करते. या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती. एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले, "मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवले. पोलिसांनी जयदेवला अटक केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.