

Women Dance Viral Video : जर तुम्ही सुद्धा 90 च्या दशकातील क्लासिक चित्रपट 'हम साथ साथ है' पाहिली असेल, तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही त्या चित्रपटाची नक्कीच आठवण येणार. चित्रपटात ज्या प्रमाणे करिश्मा कपूर तिच्या सासूला खूश करण्यासाठी 'मैय्या यशोदा' गाण्यावर नाचते. त्याचप्रमाणे एका सूनने सासूसमोर याच गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलीचा डान्स पाहून लोकांना 'हम साथ साथ है' मधील करिश्मा कपूरची आठवण झाली.
या गाण्यावर नाचणाऱ्या तरुणीचे नाव उर्विकर चौधरी आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मेडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 90 च्या दशकातील 'हम साथ साथ है' मधील "मैय्या यशोदा" या प्रसिद्ध गाण्यावर उर्विकर नाचताना दिसत आहे.समोर तिची सासू बसलेली आहे. सुनेनं केलेला डान्स पाहून सासू देखील खूश झाली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ 22 नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आली होता. व्हिडिओ जुना असला तरी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सास-बहू जोडीला पाहून खूप आनंद झाला... एका व्यक्तीने लिहिले आहे. तर आणखी एका व्यक्तीने, "हे पाहून मन खूप आनंदित झाले.. तुझा डान्स खूप सुंदर आहे, देव तुला आशीर्वाद देईल असे लिहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.