Sushant Singh : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात नवा ट्विस्ट? नितेश राणेंनी शेअर केला 'तो' व्हिडिओ

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला नवं वळण
Sushant Singh Rajput
Sushant Singh RajputSaam tv
Published On

Nitesh Rane Tweet : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरी सुद्धा या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहे. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली नाही त्याची हत्या झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातील शवागृहातील कर्मचारी रुपकुमार शाह यांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण आता आणखीच तापण्याची चिन्ह आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

Sushant Singh Rajput
Ajit Pawar : अजित पवार यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली; पोलिसांचा चोख बंदोबस्त, काय आहे कारण?

हा व्हिडिओ सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यात जो व्यक्ती मृतदेह घेऊन जात आहे तो व्यक्ती रुपकुमार शाह असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

नितेश राणेंचं ट्विट

रुपकुमार शहा यांनी सुशांतची हत्याच होती असा दावा केला आहे. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात कर्तव्यास होते, हे सांगण्यासाठी नितेश राणेंनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. रुपमकुमार हे सुशांतच्या पोस्टमार्टेमसाठी उपस्थित होते. त्यांना रडू कोसळलं होतं. खरं सत्य काय आहे, लवकरच बाहेर येईल. बेबी पेंग्विन आता दूर नाही, असं नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले.

काय म्हणाले होते रुपकुमार शाह?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच झाली, असा दावा रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला त्यावेळी मृतदेहावर जखमा होत्या. शरीराला मुका मार लागलेला होता. मृतदेहावर शवच्छेदन होत असताना मी पूर्ण वेळ तिथे होतो. डॉक्टरांना मी सांगितलं, की ही सुसाईड केस नाहीये मर्डर केस आहे. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही, असा दावाही शाह यांनी केलाय.

रुपकुमार शाह हे मुंबईतील कूपर रुग्णालयातील शवागृहात 13 ते 14 जून 2020 ला कर्तव्यास होते. दीड महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना हा दावा केला आहे. नोकरीत असताना, त्रास होऊ नये म्हणून मी गप्प होतो, असंही शाह यांनी म्हटलं आहे. याबाबत साम टीव्हीने कूपर रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. मात्र, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com