Milk Price: ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले

Mother Dairy Milk Price Hike: मदर डेअरीच्या दूधाचे दर वाढले आहेत. कंपनीने प्रति लिटर दुधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले.
Milk Price: ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले
Milk PriceSaam Tv
Published On: 

महागाईचा पुन्हा भडका उडाला आहे. दूधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मदर डेअरी दूधाच्या दरामध्ये प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दर १२ नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून लागू होणार आहेत. मदर डेअरीने दूधाचे दर वाढण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आले आहे. मदर डेअरीने १४ मे २०२६ रोजीच दूधाचे दर वाढवले होते. त्याआधी एप्रिल २०२५ ला दूधाचे दर वाढवले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर वाढले आहेत. त्यामुळे कंपनीचा खर्च वाढला असून दुधाची किंमत वाढवावी लागली. याचा परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. मदर डेअरी कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज सुमारे ३५ लाख लिटर दुधाची विक्री करते आणि एकूण कंपनीची दररोज ५० लाख लिटरपेक्षा जास्त दुधाची विक्री होते.

Milk Price: ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले
Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर वाढले आहेत त्यामुळे कंपनीला वाढीव खर्चाचा काही भाग ग्राहकांवर लादणे भाग पडले आहे. मदर डेअरी आपल्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या महसुलापैकी ७५-८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरित करते.

Milk Price: ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले
Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

मदर डेअरच्या दूधाचे दर किती?

- टोन्ड दूध - ५८ रुपयांवरून ६० रुपये प्रति लिटर झाले.

- फुल क्रीम दूध - ७२ रुपयांवरून ७६ रुपये प्रति लिटर झाले

- टोन्ड दुधाची (पाऊच) किंमत ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रति लिटर झाली.

- डबल टोन्ड दुधाचा दर ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रति लिटर झाल.

- गाईच्या दुधाचा दर ६२ रुपयांवरून ६५ रुपये प्रति लिटर झाला.

Milk Price: ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले
Gokul Milk Union: गोकुळचा अध्यक्ष कोण ठरवणार?गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा कायदेशीर पेच, निवडणुकीकडे कोल्हापूरचं लक्ष!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.