Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी

Iran Missile Attack On UAE Tanker: इराणने यूएईच्या दोन जहाजांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी
Iran Missile Attack On UAE TankerSaam Tv
Published On
  • इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत यूएईच्या दोन टँकर्सवर हल्ला केला

  • या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू

  • या हल्लायामध्ये ८ जण जखमी झालेत. त्यात ६ भारतीय आहेत

  • यूएईने हल्ल्याचा निषेध करत प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला

मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील 'महायुद्धा'ची आग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आखाती देशांपर्यंत पसरली आहे. पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना लक्ष्य केले. इराणने यूएईच्या २ टँकर्सवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृ्त्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील कुवेत येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये यूएईच्या ध्वज असलेल्या दोन टँकरवर इराणने केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इतर आठ कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी
Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

इराणने ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिण मार्गावर मोम्बासा आणि बाहिया या टँकर्सना लक्ष्य करण्यात आले. या टँकर्सवर अनेक भारतीय कामगार होते. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये ६ भारतीय आणि २ युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दोन्ही जहाजांना आग लागली होती परंतु नंतर ती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली.

Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी
Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

युएईने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. युएईने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आणि भंग असल्याचे म्हटले आहे. इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे यूएईने म्हटले. तसेच प्रदेशाच्या सुरक्षेला आणि स्थिरतेला धोका असल्याचे सांगितले.

यूएईच्या सरकारने स्पष्ट केले की, यूएई आपले सार्वभौमत्व, नागरिक, राष्ट्रीय हितसंबंध आणि नागरीकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल. देशाचे सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर असून कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी
Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

इराणला मनमानीने वागण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणने आखाती देशांमधील प्रादेशिक तणावाला खतपाणी घातले आहे. इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत निर्णय घ्यावा लागेल कारण त्याचा आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर परिणाम होईल ज्यामुळे देशांचे नुकसान होईल.

संरक्षण मंत्रालयाने असेही सांगितले की, त्यांचे सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर असून कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जहाजांवर त्यांच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इशारा म्हणून गोळीबार केल्याचा दावा इराणने केल्यानंतर यूएईने ही घोषणा केली.

Missile Attack: तणाव वाढला! इराणकडून UAE च्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू तर ८ जखमी
US Iran Peace Deal : अमेरिका इराणच्या १०८ दिवसांच्या युद्धाला पूर्णविराम! १० कलमी शांती करारात अटी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com