Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

Iran-America War Update: जगाचे टेन्शन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. इराणने कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला केला.
Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला
Iran-America WarSaam Tv
Published On
  • इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता

  • पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे

  • इराणने कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा

  • कुवेत विमानतळाच्या टर्मिनलला मोठे नुकसान झाले

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आखाती देश पुन्हा एकदा युद्धाची आगीत होरपळण्याची चिन्हे आहेत. इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष कसा उफाळून आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

शस्त्रसंधीचं घोंगडं भिजत ठेवणाऱ्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. इराणनं कुवेत आणि बहरीनमधील लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केलेत. इराणच्या हल्ल्यात विमानतळाच्या टर्मिनल-1 चं मोठं नुकसान झालं असून अनेक प्रवासी आणि कर्मचारी जखमी झालेत. विशेष म्हणजे, कुवेतमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी आलेले इराणी ड्रोन अमेरिकन सैन्यानं हवेतच पाडले आहेत. दरम्यान, आखातात अमेरिका आणि इराण यांच्यात कशा घडामोडी घडल्यात पाहूयात...

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला
Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

अमेरिकन लष्करानं आखाती प्रदेशात इराणने केलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचा दावा केलाय. आखाती देश आणि अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करणारे इराणचे अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले नष्ट करण्यात आल्याचं अमेरिकन लष्करानं म्हटलंय. अमेरिकेच्या लष्करानं प्रत्युत्तरा दाखल इराणच्या केशम बेटावर हल्लेही केलेत.

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला
अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला, इराणही अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानेही इराणच्या हल्ल्याला दुजोरा दिलाय. कुवेतनं इराणच्या हल्ल्याचं वर्णन इराणची गुन्हेगारी आक्रमकता असं केलंय. त्यामुळे या संघर्षानंतर संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा पुन्हा भडका उडण्याची भीती निर्माण झालीये. इराणच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्कर अत्यंत सतर्क असून इराणच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. या नव्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुढील दिवसांत कुठल्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला
Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com