

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ल्याची शक्यता
इराणच्या शेजारील देशांत अमेरिकेची लष्करी तैनाती
चीनकडून इराणला लष्करी मदतीचे संकेत
व्हेनेझुएलावरील या विध्वसंक हल्ल्ल्यानंतर आता अमेरिकेनं आपला मोर्चा इराणकडे वळवलाय. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर आता इराणचे खोमेनी अमेरिकेच्या रडारवर आहेत. इराणच्या शेजारील देशात लष्कर तैनात करत अमेरिकेने इराणला वेढा घालण्यास सुरुवात केलीय.त्यामुळे पुढच्या 48 तासांतच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
यादृष्टीनेच अमेरिकेचे नवे F35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झालं असून
युद्ध झाल्यास F35 ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एवढंच नाही तर
USS अब्राहम लिंकन 90 लढाऊ विमानं तैनात
इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देश्यानं
तेहरानसह इराणमधील मोठी शहर अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत एवढंच नव्हे तर इराणमधील अणुकेंद्रही अमेरिकाच्या निशाण्यावर आहे.
जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यानं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे.दुसऱीकडे चीनने इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे. चीनने इराणच्या मदतीसाठी 16 लढाऊ विमानं पाठवली आहेत ..त्यामुळे मादुरोनंतर खामेनींचं अपहरण करून अमेरिका इराणवर हल्ला करणार का? आणि इराण अमेरिकेच्या मनसुब्यांना नेमकं कसं रोखणार? याकडे जगाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.