

होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग
भारतीय खलाशी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेबाबत चिंता
जागतिक तेल बाजार आणि अर्थव्यवस्थेवरही या घडामोडींचे परिणाम
आखातात पुन्हा एकदा महायुद्धाचा भडका उडालाय. अमेरिकेने सलग चौथ्या दिवशी इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत तब्बल सात तास बॉम्बे हल्ले केलेत. या हल्ल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तळ, नौदलाची जहाजं आणि इराणी संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आलीय. त्याला प्रत्युत्तर म्हणून IRGCनं ही बहरीन,कुवैत आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला केलाय. त्यामुळे गेल्या 24 तासात अमेरिका-इराण संघर्षाची झळ भारतालाही बसलीय.
१)
इराणी सैन्याच्या हल्ल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर हल्ला केला. यात एका भारतीयाचा मृत्यू आणि 10 जण जखमी झाले. जहाजावर एकूण 20 भारतीय खलाशी होते.
२)
होर्मुझमधील जहाजांवरील हल्ल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीतील इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला.
३) युद्धपरिस्थितीमुळे भारताशी संबंधित 11 जहाजे आणि 148 भारतीय खलाशी पर्शियन आखातात अडकलेत...ही सर्व जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्ष थांबण्याची वाट पाहतायत...
4) ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर 20% कर लावण्याचा निर्णय मागे घेतला.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्यात सूडाची भावना प्रचंड वाढलीय.अशा परिस्थितीत जर ट्रम्प यांनी इराणचा महत्त्वाचा अणु-प्रकल्प असणाऱ्या 'पिकॅक्स माउंटन'वर हल्ला केला, तर इराणकडून होणारा पलटवार हा फक्त मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. या संघर्षातूनच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल.त्यामुळे आता ट्रम्प 'पिकॅक्स माउंटन'वर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय घेणार का? आणि होर्मुझमधून भारतीय खलाशांची सुखरूप सुटका होणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.