Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Mexico Train Accident: मेक्सिकोमध्ये भयंकर रेल्वे अपघात झाला. ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. यामधील काही डबे थेट दरीत कोसळले. या अपघातामध्ये १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Mexico Train AccidentSaam Tv
Published On

Summary:

  • मेक्सिकोमध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली

  • ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले

  • अपघातामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू तर ९८ जण जखमी झाले

  • तीव्र वळणावर ट्रेन रुळावरून घसरली या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे

मेक्सिकोमध्ये भयंकर रेल्वे अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ९८ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. दक्षिण मेक्सिकोतील ओक्साका येथे ही घटना घडली. रेल्वेचे डबे रूळावरून घसरले आणि दरीत कोसळले. रविवारी हा अपघात झाला. राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले.

Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनमधून २५० जण प्रवास करत होते. यामध्ये ९ क्रू मेंबर्सचा देखील समावेश होता. वळणावर ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला ९८ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. यामधील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या रेल्वे अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या अपघातासंदर्भात पोस्ट करत सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. चिवेला आणि निजांडा शहरांदरम्यान हा अपघात झाला. निजांडाजवळ एका तीव्र वळणावर ट्रेनचे नियंत्रण सुटले आणि तिचे डबे रुळावरून घसरून दरीत पडले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Accident: समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा

मेक्सिकोच्या अ‍ॅटर्नी जनरल ऑफिसने रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी सांगितले की मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. ओक्साकाचे गव्हर्नर सलोमन जारा यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये २५० प्रवासी होते. १३९ प्रवासी सुरक्षित आहेत.

Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Famous Director Accident : शूटिंगदरम्यान मोठा अपघात; जखमी अवस्थेत प्रसिद्ध दिग्दर्शकाला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com