Northeast Election Results : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये कोण बाजी मारणार? काही तासांत चित्र स्पष्ट होणार

Meghalaya Tripura Nagaland Election Result: ईशान्य भारतात कोणता पक्ष बाजी मारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचे काही तासांत चित्र स्पष्ट होणार होणार आहे.
Northeast Election Results
Northeast Election ResultsSaam tv
Published On

Northeast Election Results : ईशान्येतील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय विधानसभेचा आज निकाल लागणार आहे. तीनही राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ईशान्य भारतात कोणता पक्ष बाजी मारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचे काही तासांत चित्र स्पष्ट होणार होणार आहे. (Latest Marathi News)

त्रिपुऱ्यात २०१८ मध्ये भाजपने मारली होती बाजी

2018 मध्ये 59 जागांवर झालेल्या निवडणूकीत भाजपने (BJP) 35 जागा जिंकत डाव्यांचा 25 वर्षांचा गड काबिज केला होता. पक्षाने सुरूवातीला बिप्लब देव यांना मुख्यमंत्री केले, मात्र, ते फार काळ सत्तेवर राहू शकले नाही भाजपने मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले.

Northeast Election Results
Rajasthan News : आईच्या कुशीतील बाळाला कुत्र्याने फरफटत नेले; सरकारी रुग्णालयातील संतापजनक घटना

मेघालयमध्ये २०१८ मध्ये काँग्रेसला मिळाल्या होत्या सर्वाधिक जागा

मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला (Congress) सर्वाधिक 21 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले होते त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स स्थापना केली आहे.

नागालँडमध्ये ठरणार भाजप किंगमेकर?

नागालँडमध्ये सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. नेफ्यू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी 2017 ला स्थापना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. २०१८ निकाल पाहता यंदा भाजप यंदा किंगमेकर होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मेघालय

एकूण जागा ६० जागा

२०१८ ची स्थिती

भाजपः२

कॉंग्रेसः२१

एनसीपीः ०१

एनपीइपीः १९

नागालँड

एकूण जागा ६० जागा

२०१८ ची स्थिती

भाजपः१२

कॉंग्रेसः००

एनपीएफः२६

एनडीपीपीः१७

Northeast Election Results
Viral Video: ग्रेट सरप्राईज! जेव्हा शेतात राबणाऱ्या आईला DSP मुलगा भेटायला येतो, संवाद ऐकून नेटकरीही म्हणाले; 'लेक असावा तर असा...'

त्रिपुरा

एकूण जागाः६० जागा

२०१८ ची स्थिती…

भाजपा… ३५

कॉग्रेसः ००

सीपीएमः १६

आईपीएफटीः ८

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com