Viral Video: ग्रेट सरप्राईज! जेव्हा शेतात राबणाऱ्या आईला DSP मुलगा भेटायला येतो, संवाद ऐकून नेटकरीही म्हणाले; 'लेक असावा तर असा...'

हा मुलगा त्याच्या आईसारख्या शेतात राबणाऱ्या असंख्य माऊलींचे प्रश्न सोडवेल, अशी आशा करतो," असा सुंदर कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे....
Madhya Pradesh Viral Video
Madhya Pradesh Viral VideoSaamtv

Madhya Pradesh Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी कधी पोट धरुन हसायला लावतात, तर कधी भितीने गाळणही उडवतात. पण सध्या एक आगळावेगळा प्रेरणादायी व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ एका शेतकरी आईचा आणि तिच्या डिवायएसपी झालेल्या मुलाचा आहे. या दोघांमधील झालेल्या संवादाने नेटकरीही चांगलेच भावूक झाले आहेत, काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील कथा, चला जाणून घेवू. (Viral Video)

Madhya Pradesh Viral Video
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाण्याची शक्यता

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) आहे. या व्हायरल व्हिडिओची कथा म्हणजे ग्वाल्हेर जिल्ह्यातील सुपुत्र संतोष पटेल हे डीएसपी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावी गेले. यावेळी त्यांनी शेतात काम करणाऱ्या आईची भेट घेतली. या भेटीमधील आई आणि मुलाचा संवाद डोळ्यात पाणी आणणारा आहे.

प्रत्येकाला भावूक करणारा आणि आई-मुलाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम दाखवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

Madhya Pradesh Viral Video
Nitesh Rane: राजकारण तापलं! भर अधिवेशनात नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले; '१० मिनिटे त्यांचे संरक्षण काढा पुन्हा...'

डीएसपी झाल्यानंतर संतोष पटेल पहिल्यांदाच आईला भेटण्यासाठी गावी आले आणि त्यांनी आपल्या आईला सरप्राईज दिलं. शिवाय आपल्या मुलाला थेट शेताच्या बांधावर आल्यालं पाहून आईलादेखील खूप कौतुक वाटत आहे. संतोष पटेल पहिल्यांदाच आईला भेटण्यासाठी गावात पोहोचला तेव्हा ती शेतात गवत कापत होती.

आपल्या मुलाला पोलिसाच्या वर्दीत पाहून आईला खूप आनंद झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय यावेळी ते दोघ आपल्या गावच्या भाषेत बोलताना दिसत आहेत. यामध्ये तु शेतात का काम करत आहेस, असे संतोष पटेल आपल्या आईला विचारतात, तेव्हा त्या आपल्या मुलासाठी आईला नेहमीच काहीतरी करावंस वाटत, असे म्हणताना दिसत आहेत.

शेतात राबणाऱ्या आईचे आणि तिच्या कर्तुत्ववान मुलाचा हा कौतुकास्पद संवाद नेटकऱ्यांना खूपच भावला आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून आपल्या आईसाठी असं सरप्राईज देणाऱ्या मुलाचे जोरदार कौतुक केले आहे. लेक असावा तर असा अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत.

सध्या हा व्हिडिओ तुफान चर्चेत असून "हा अधिकारी त्याच्या आईसारख्या शेतात राबणाऱ्या असंख्य माऊलींचे प्रश्न सोडवेल, अशी आशा करतो," असा सुंदर कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे. तसेच शेतात राबणाऱ्या आईचे अन वर्दीतील मुलाचे संभाषण तरी ऐका, असे आवाहनही नेटकऱ्यांना करण्यात आले आहे.. (Latest Marathi Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com