Rajasthan News : आईच्या कुशीतील बाळाला कुत्र्याने फरफटत नेले; सरकारी रुग्णालयातील संतापजनक घटना

Dog Killed New Born Baby: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Rajasthan News
Rajasthan NewsSaam tv

Sirohi News: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या एका रुग्णालयातून भटक्या कुत्र्याने नवजात अर्भकाला आईच्या कुशीतून बाळाला कुत्र्याने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याने फरफटत नेल्याने या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत बाळाच्या मुलाच्या वडिलांचं सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाच्या मृत्यूने कुटुंबीयांच्या सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्देवी घटनेतील बाळ अवघ्या एका महिन्याचा होता. घटना घडताना बाळ हे रुग्णालयात आई आणि त्याच्या दोन भाऊ-बहिणी आणि वडिलांसोबत लादीवर झोपला होता. त्यावेळी रुग्णालयात भटका कुत्रा (Dog) आला. त्यावेळी कुत्र्याने बाळाला फरफटत नेले.

Rajasthan News
Nagar : हृदयद्रावक! आधी आईनं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पाठोपाठ २ तरूण मुलींनीही मृत्युला कवटाळलं

दरम्यान, या घटनेतील बाळाचा मृतदेह व्हिडिओ शव गृहाजवळील पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला. खळबळजनक बाब ही आहे की, या कुत्र्याने बाळ फरफटत नेताना त्याचे दृश्य सीसीटीव्हीत आढळून आले नाही.

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या संतापजनक घटनेनंतर जिल्हाधिकारी भंवर लाल यांनी नर्सिंग ऑफिसर सुरेश मीणा यांना तातडीने निलंबित केलेआहे. तसेच गार्ड भवानी सिंह आणि वार्ड बॉय उज्ज्वल देवासी यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

Rajasthan News
Telangana Medical Student : रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, हैदराबादमधील मन सुन्न करणारी घटना

नवजात बाळाच्या मृत्यूने त्याच्या गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील कुत्रा रुग्णालयात कसा शिरला, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com