राजकारणात मोठा भूकंप! आणखी एक पक्ष फुटला; 8 आमदार भाजपमध्ये

8 UDP MLAs Join BJP In Meghalaya: मेघालयच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. UDPच्या आठ विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपची मेघालय विधानसभेतील आमदारसंख्या 2 वरून 10 वर पोहोचली आहे.
Meghalaya UDP MLAs switch to BJP latest news
Meghalaya UDP MLAs switch to BJP latest newssaam tv
Published On

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला आणि आमदारांनी स्वतःचा गट स्थापन करत भाजपसोबत सत्तेत सामील झाले. अशातच आज मेघालयच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीचे आठ आमदारांनी कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा उपस्थित होते.

Meghalaya UDP MLAs switch to BJP latest news
आणखी एका पक्षात उभी फूट; १२ पैकी ९ आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश, मोठी राजकीय उलथापालथ

आठ आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर मेघालय विधानसभेत भाजपची आमदारसंख्या 2 वरून थेट 10 वर पोहोचली आहे. दुसरीकडे , UDP च्या आमदारांची संख्या 12 वरून 4 वर आली आहे. UDP सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आठ आमदारांमध्ये लहकमन रिंबुई, पियुस मारवीन, किर्मेन शायला, मायरेलबोर्न सिएम, मैथ्यू कुरबाह, ओलान सिंह सुइन, बालाजीड कुफार सिनरेम आणि सिनशार लिंगदोह थाबाह यांचा समावेश आहे. हे सर्व मेघालय विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत.

Meghalaya UDP MLAs switch to BJP latest news
राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

मेघालयमध्ये सध्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखाली मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सची (MDA) सत्ता आहे. कॉनरोड के. संगमा हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, 60 सदस्यांच्या विधानसभेत NPP हा सर्वात मोठा पक्ष आहे. या आघाडी सरकारमध्ये UDP आणि भाजप हे दोन्ही पक्ष सहभागी आहेत. आठ आमदारांच्या भाजप प्रवेशाआधी P हा MDAमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, आता भाजपची आमदारसंख्या UDPपेक्षा जास्त झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com