

मेघालयात यूडीपीचे 9 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता
टीएमसीचे चारही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
मेघालयात भाजपच्या ऑपरेशन कमळाला वेग; 13 आमदारांच्या पक्षांतराची चर्चा
मेघालयात भाजपच्या 'ऑपरेशन कमळ'ला वेग येत असल्याचे दिसून येत आहे. 'युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी'ला मोठा सुरूंग लावत भाजपनं ९ आमदरांनाफ फोडलंय. या आमदाराच्या फोडाफोडीमुळे सध्या विधानसभेत केवळ दोन आमदार असलेला हा पक्ष अचानक १५ आमदारांच्या संख्येवर पोहोचण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण १३ विद्यमान आमदार असलेल्या यूडीपीचे (UDP) नऊ आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या चार आमदार भाजपमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत.
या प्रकरणाबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू असल्याची पुष्टी भाजपच्या राज्य नेत्यांनी केली आहे. विशेष म्हणजे टीएमसी आमदाराचा जो ग्रुप भाजपमध्ये सामील होणार आहे, त्यात माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा हे देखील सामील आहेत. ६० सदस्यांच्या विधानसभेत यूडीपीचे (UDP) १२ आणि टीएमसीचे ४ आमदार आहेत; त्यापैकी काहींनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीय.
नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या नेतृत्वाखालील 'मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स' सरकारमधील भागीदार पक्ष असलेल्या UDP मध्ये, सप्टेंबर २०२५ मधील मंत्रिमंडळ फेरबदलांनंतर असंतोष निर्माण झाला. पर्यटन मंत्री पॉल लिंगडोह यांच्या जागी पक्षाचे अध्यक्ष मेटबाह लिंगडोह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानंतर पक्षात गटबाजी अधिक होऊ लागली. २०२८ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ही दरी अधिकच वाढू लागली.
तरीही, यूडीपी (UDP) मधील सूत्रांनी अशा हालचालीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावलेली नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "मला या गोष्टीला दुजोरा द्यायचा नाही किंवा याचा नकार द्यायचा नाही. जर पक्षाची फूट होणार असेल, तर ती होईलच. जर त्यांच्याकडे पक्षांतरबंदी कायद्याला बगल देण्यासाठी आवश्यक संख्याबळ असेल, तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही." उल्लेखनीय बाब म्हणजे, पॉल लिंगडोह यांनी यापूर्वी या अफवांची दखल घेतली होती, परंतु आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, मेघालयातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, जरी प्रदेशाध्यक्षांनी यूडीपी (UDP) आमदारांना निमंत्रित केले होते, तरी आता ते थेट केंद्रीय नेत्यांशी चर्चा करतील, या टप्प्यावर कोणताही अंदाज वर्तवण्याची आपली इच्छा नाही आणि आपण निकालाची वाट पाहू, असेही त्यांनी नमूद केले. सध्या विधानसभेत भाजपचे दोन आमदार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.