
मेरठ : लहानपणापासूनच प्रेम, लग्नासाठी तीन वेळा घरातून पळाले आणि सौरभनं मुस्कानशी लग्न केलं. पण त्याला पत्नीकडून केवळ धोका मिळाला. जिच्यासाठी सौरभने आपल्या कुटुंबाविरोधात गेला, तिनेच त्याची हत्या केली. मेरठमध्ये झालेल्या माजी नेव्ही कर्मचाऱ्याच्या हत्येनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.
सौरभच्या कुटुंबीयांनी सांगितलं, की सौरभ लहानपणापासून अतिशय चंचल स्वभावाचा होता. पण अभ्यासात तो हुशार होता. घरातील सर्वात लहान असल्याने तो सर्वांचाच लाडका होता. वयाच्या १३व्या वर्षी सौरभ पहिल्यांदा मुस्कानला भेटला आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता. पाच वर्ष दोघेजण प्रेमात होते. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघंही अल्पवयीन असल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांना लग्नासाठी परवानगी दिली नाही. या दरम्यान सौरभने मर्चंट नेव्हीचा कोर्स केला आणि त्यानंतर त्याला शिपिंग कंपनीत नोकरी मिळाली.
सौरभ नोकरी लागल्यानंतर २०१६ मध्ये घरी आला. त्यावेळी दोघे घर सोडून पळाले होते. नंतर कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना शोधून काढलं आणि समजावलं. पण पुन्हा तीन महिन्यांनी ते पळून गेले आणि पुढच्या तीन दिवसांत ते परत घरी आले. सौरभ मुस्कानला सोडण्यास तयार नव्हता. अखेर दोघांनी अल्पवयीन असूनही २०१६ मध्ये घर सोडलं आणि लग्न केलं. लग्नानंतर सौरभच्या कुटुंबीयांनी आपल्या लेकासाठी दोघांचं लग्न मान्य केलं. पण लग्नानंतर काही महिन्यातच मुस्कानने तिचा खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.
लग्नानंतर मुस्कान सतत भांडणं करायची. ती कुटुंबाला जेलमध्ये पाठवेल अशा धमक्या द्यायची. यालाच कंटाळून सौरभच्या वडिलांनी तिला घरातून बेदखल केलं. त्यानंतर सौरभ मुस्कानसोबत एका भाड्याच्या खोली राहू लागला. २०२३ मध्ये सौरभ नोकरीसाठी लंडनला गेला. याचदरम्यान मुस्कानची साहिल शुक्लाशी ओळख झाली आणि दोघे प्रेमात आकंठ बुडले. साहिल हा सौरभचा शाळेतला मित्र होता. सौरभ लंडनला असताना साहिल शुक्ला आणि मुस्कानची जवळीक वाढली, असं सौरभच्या आई वडील आणि बहिणीने सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.