Nagpur Violence : नागपूरमधील संचारबंदी हटवली, सहा दिवसानंतर कर्फ्यू मागे; पोलीस बंदोबस्त कायम

Nagpur Violence Update : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.
Nagpur riots case Curfew lifted after six days
Nagpur riots case Curfew lifted after six daysSaam Tv News
Published On

नागपूर : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी अखेर हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्चही काढला. गणेशपेठ, कोतवाली , तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली. त्यामुळे व्यापारी, दुकानमालकांना तसेच छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन झालेल्या वादानंतर १७ मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती.

संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची संपूर्ण नजर राहणार असल्याचं देखील पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं.

Nagpur riots case Curfew lifted after six days
SRH vs RR Live Score, IPL 2025: किशनची धमाकेदार शतकी खेळी; हैदराबादने राजस्थानपुढे ठेवलं 287 धावांचं तगडं आव्हान

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली.

Nagpur riots case Curfew lifted after six days
Buldhana Crime : अवैध दारू विक्रेत्यांचा पाठलाग, दोघांनी पोलिसांच्या चालत्या बाईकला लाथ मारली, अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com