
आयपीएलच्या १८ व्या सत्राचं दमाख्यात सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात आरसीबीनं केकेआरचा दारूण पराभव करत आपला जोर दाखवला. आज आयपीएल टुर्नामेंटचा दुसरा सामना राजस्थान आणि सनराझजर्स हैदराबादमध्ये होत आहे. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हैदराबादला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मागील वर्षाप्रमाणेच हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. इशान किशनच्या शतकी खेळीने हैदराबाद 286 धावा केल्या. आपलाच विक्रमी धावसंख्या तोडण्याचा विक्रम अवघ्या एका धाव संख्येमुळे हुकलं.
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. हैदराबादच्या संघाने अवघ्या 15 षटकांत 200 धावा पार केल्या. ट्रेविस हेडच्या विकेटनंतर इशान किशनने जोरदार फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला. इशानने 45 चेंडूमध्ये 100 धावा केल्या. IPL 2025 मध्ये नवीन संघाकडून खेळताना इशान किशनने धमाका केला.य पहिल्याच सामन्यात धुवाँधार फटकेबाजी करत त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 200 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादने 1 गडी गमावत 94 धावा केल्या होत्या. इशान किशनच्या आधी हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडपलं. त्याने 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक होतं. त्यानंतर मैदानात आलेल्या किशनने राजस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं.
यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महिश तिक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.