
आयपीएलमधल्या पहिल्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याला अवघ्या काही तासात सुरुवात होणार आहे. हैदराबाद आणि राजस्थानच्या सामन्यानंतर मुंबई आणि चेन्नई हे दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघांनी आयपीएलच्या इतिहासात ५-५ वेळा जेतेपद मिळवले आहे. एकमेकांवर वरचढ ठरणाऱ्या या संघांचा मुकाबला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना एमए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. चिंदबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकमध्ये सामना असल्याचा फायदा चेन्नईच्या संघाला काही प्रमाणात होणार आहे. तर सीएसकेचा चेपॉकमध्ये पराभव करण्यासाठी मुंबईचा संघ देखील सज्ज झाला आहे. सामन्यात सीएसकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्लो ओव्हर रेट नियमामुळे हार्दिक पंड्यावर पहिल्या सामन्याची बंदी राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे. त्याला रोहित शर्माची मदत होईल. दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्सची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएस धोनीच्या मार्गदर्शनाने गायकवाडला नक्कीच फायदा होईल.
कोण आहे सत्यनारायण राजू?
सत्यनारायण राजू हा आंध्रप्रदेशमध्ये राहतो. तो वेगवान गोलंदाज आहे. २०२४ च्या आंध्र प्रीमियर लीगमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तो प्रकाशझोतात आला होता. त्याने सात सामन्यांमध्ये ६.१५ च्या चांगल्या इकॉनॉमीने आठ विकेट्स घेतल्या होत्या. हा खेळ पाहून मुंबई इंडियन्सने त्याचा संघामध्ये समावेश केला.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा, रियान रिकल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सॅंटनर, दिपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दिपक हुडा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस ,खलील अहमद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.