रिफायनरी प्रकल्पात भीषण आग, PM मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन, आज घडली दुर्घटना

Rajasthan refinery news today : राजस्थानमधील पचपद्रा येथील रिफायनरी प्रकल्पात उद्घाटनाच्या एक दिवस आधी भीषण आग लागली. पीएम मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं
Rajasthan refinery news today
Rajasthan refinery news today
Published On

राजस्थानमधील रिफायनरी प्रकल्पात भीषण आग लागल्याची घटना समोर आली. आग इतकी भीषण होती की परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिफायनरीचे उद्घाटन होणार होते. पण त्याआधीच रिफायनरीत भीषण आग लागली. आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते. याचे व्हिडिओ समोर आले आहेत. आगीमुळे रिफायनरी परिसरात एकच खळबळ उडाली.

दुर्घटना झालेली ही रिफायनरी राजस्थानातील बाळोतरातील पचपद्रा येथे उभारण्यात आलेली आहे. हिंदुस्थानमधील पहिली ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, २१ एप्रिल रोजी रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. त्याच्या केवळ एक दिवस आधी आग लागली.

या रिफायनरीची पायाभरणी आधी २२ सप्टेंबर २०१३ रोजी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात झाला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली होती. याचा सुरुवातीचा अंदाजित खर्च ३७,२३० कोटी रुपये होता. राजस्थानमध्ये सरकार बदलल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी १६ जानेवारी २०१८ रोजी हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला. त्याचा खर्च ४३,१२९ कोटी रुपये इतका सुधारित करण्यात आला.

Rajasthan refinery news today
Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हा ऐतिहासिक प्रकल्प भारताची ऊर्जा सुरक्षा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या या प्रकल्पाअंतर्गत 79,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 9 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष (एमएमटीपीए) क्षमतेचा ग्रीनफिल्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल संकुल उभारण्यात आला आहे.

अत्याधुनिक संकुलात 2.4 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष पेट्रोकेमिकल क्षमतेसह रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल उत्पादनाचे एकत्रीकरण केले आहे. या रिफायनरीचा नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स 17.0 असून पेट्रोकेमिकल उत्पादन 26% पेक्षा जास्त आहे, जे कार्यक्षमता आणि शाश्वततेसाठीच्या जागतिक मानकांशी सुसंगत आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा, पेट्रोकेमिकल क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि उद्योगक्षेत्राला चालना देण्यात हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

Rajasthan refinery news today
Kolhapur : दुर्दैवी! रस्त्याने जाताना अंगावर भिंत कोसळली, प्राध्यापिका अन् शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com