भाजप नेत्याच्या घराला लागली भीषण आग; स्फोटामुळे शेजारीही घाबरले

bjp house fire : भाजप नेत्याच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या स्फोटामुळे शेजारीही घाबरले.
bjp news
bjp house fireSaam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भाजप नेत्याच्या घराला भीषण आग

आग लागल्यानंतर एकामागोमाग स्फोट झाले

शेजाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला दिली माहिती

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये भोपुरा येथील डीएलएफ कॉलनीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. भाजप नेते मान सिंह गोस्वामी यांच्या घराला आग लागल्यानंतर एका पाठोपाठ स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजामुळे शेजारी लोक घाबरले. स्फोटादरम्यान मान सिंह यांचं कुटुंब घरात होते. स्फोटानंतर शेजारी लोक घरातून बाहेर आलं.

मानसिंह गोस्वामी हे भाजपच्या पश्चिम उत्तर प्रदेशचे क्षेत्रीय उपाध्यक्ष आहेत. स्थानिक नगरसेवक रेखा गोस्वामी यांचे पती आहेत. गोस्वामी कुटुंबीयांनी सांगितलं की, घराला आग लागल्यानंतर शेजारी लोक घराबाहेर आले. आमच्या घराला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या घरांना देखील आग लागू लागली. स्फोटाचा आवाज आल्याने परिसरात बहुतेक रस्त्यावर जमा झाले. स्थानिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली'.

bjp news
मोठी बातमी! मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई; लाचखोर अधिकारी जाळ्यात सापडला

आगीच्या घटनेवर भाजप नेते काय म्हणाले?

भाजप नेते मानसिंह यांनी म्हटलं की, 'आमच्या जीवाला धोका आहे. ही आग दुर्घटना नसून कोणीतरी जीवघेणा हल्ला केला आहे'. आगीची ही दुर्घटना १० फेब्रुवारीच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मानसिंह पुढे म्हणाले, 'मी उशिरा रात्री घरात झोपत होते. त्याचवेळी अचानक घरातून स्फोटाचा मोठा आवाज आला. त्यानंतर अंथरूण उचलून घराबाहेर आलो. तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजाला आग लागली होती. घरात आगीचे लोट पसरले होते'.

bjp news
चंद्रपूरवरुन ठाकरे बंधूंमध्ये ठिणगी? ठाकरेंचा भाजपला पाठिंबा, मनसेचा टोला

पोलीस अधिकारी अतुल कुमार यांनी सांगितलं की, 'घराच्या बाहेर वीजेचे बोर्ड होते. त्याचे बटण बंद होते. आम्ही आगीच्या दुर्घटनेचं कारण शोधत आहोत. आम्हाला प्रथमदर्शनी कोणीही हल्ला केल्याचे भासले नाही. आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांशी चर्चा केली. त्यांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com