Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील छतरपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला दीरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याला सांगूनच महिला दीरासोबत पळाली. या प्रकारानंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
नवऱ्याने पोलिसांत जाऊन माझ्या बायकोपासून माझी सुटका करा, अशी मागणी केली. बायकोला दीरापासून सुंदर मुले हवेत. यामुळे बायको दीरासोबत पळून गेल्याचे नवऱ्याने पोलिसाला सांगितलं. तसेच आता भाऊ आणि बायको धमकी देऊ लागले आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी नवऱ्याने पोलिसांत आल्याचे सांगितले. मला माझ्या पत्नीपासून वाचवा, अशी मागणी नवऱ्याने पोलिसांत केली.
नवऱ्याने पोलिसांत सांगितलं की, 'बायकोने लग्नाच्या १० वर्षांनंतरही मुलाला जन्म दिला नाही. तिला सुंदर मुले हवेत. तिला वाटतं की, तिचा नवरा सुंदर नाही. तिला दीर सुंदर वाटतो. त्यामुळे तिला दीरापासून मुले हवेत. त्यामुळे तिचं दीरावर प्रेम जडलं आहे. या सर्व प्रकारानंतर सासूने सूनेला जाब विचारला. त्यानंतर बायको घरातून धूम ठोकली.
राजेंद्र कुशवाहा यांनी कुटुंबातर्फे एसपी कार्यालयात निवेदन दिलं. त्यात म्हटलं की, 'माझं दहा वर्षांपूर्वी मीन कुशवाहासोबत लग्न झालं. मीना माझ्या लहान भावासोबत पळून गेली. आता माझी बायको आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलो आहे. ती आधीच दीरासोबत पळून गेली, त्यानंतर आता आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत.
तिने काही केल्यास त्याला सासरचे लोक जबाबदार राहणार असल्याचं म्हटलं आहे. आता आम्ही म्हणतोय की, तिने तिचं जीवन जगावं. आम्हाला त्रास देऊ नये. आता जितकी बदनामी झाल्याची झाली आहे. आता आम्हाला अजून नाव खराब करायचं नाही, असं पळून गेलेल्या महिलेच्या पतीने म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.