लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीलाही वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी, हायकोर्टाचा निर्णय नेमका काय?

Allahabad High Court Directs Fresh Review of Married Woman: विवाहित असल्याच्या एकमेव कारणावरून मुलीला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. मनीषा त्यागी यांच्या प्रकरणात न्यायालयाने नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले.
MARRIED DAUGHTER COMPASSIONATE APPOINTMENT
MARRIED DAUGHTER COMPASSIONATE APPOINTMENTsaam tv
Published On: 

विवाहीत असल्याच्या एकमेव कारणावरून मुलीला अनुकंपा नियुक्तीसाठी अयोग्य ठरवता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. मात्र विवाहित मुलीला अनुकंपा नियुक्तीचा आपोआप अधिकार मिळत नाही. तिची शैक्षणिक पात्रता, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि संबंधित पदाची जागा यांसारख्या अटीच्या आधारे विभागाने निर्णय घ्यावा असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

MARRIED DAUGHTER COMPASSIONATE APPOINTMENT
Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले

न्यायमूर्ती मंजू राणी चौहान यांनी सहारनपूरच्या जिल्हा मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांच्या 14 नोव्हेंबर 2024 रोजीचा आदेश रद्द केला. तसेच याचिकाकर्ती मनीषा त्यागी यांच्या अनुकंपा नियुक्तीच्या दाव्याचा नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात आठ आठवड्यांच्या आत कारणांसह नवीन आदेश पारित करण्यास कोर्टाने सांगितले.

MARRIED DAUGHTER COMPASSIONATE APPOINTMENT
Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

मनीषा यांचे वडील धर्मवीर सिंह हे प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. 14 मे 2015 रोजी सेवेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यानंतर मनीषा यांनी 17 मे 2016 रोजी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता. मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या फॅमिली पेन्शन आणि इतर सेवा लाभांवर कोणाचा अधिकार असेल, हे संबंधित सेवा नियमांनुसार ठरवले जाईल, असेही अलाहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. केवळ उत्तराधिकार कायद्याच्या आधारे या लाभांवरील अंतिम हक्क निश्चित करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती अनिल कुमार दशम यांनी शशी यांची अपील मंजूर करत सक्षम प्राधिकरणाला नव्याने घेण्याचे निर्देश दिले.

MARRIED DAUGHTER COMPASSIONATE APPOINTMENT
Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

हे प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांतील दिवंगत कॉन्स्टेबल सुशील कुमार यांच्या सेवा लाभांशी संबंधित आहे. शशी यांनी विभागाकडे जमा असलेल्या 2 लाख 64 हजार 521 रुपयांच्या रकमेतील निम्म्या हिस्स्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्राची मागणी केली होती. या रकमेत पेन्शन, ग्रॅच्युइटी, समूह विमा आणि इतर सेवा लाभांचा समावेश होता. शशी यांनी आपण सुशील कुमार यांच्या पत्नी असल्याचा दावा केला होता, तर दुसऱ्या पक्षाने देव सहगल हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले. सत्र न्यायालयाने शशी यांना पत्नी आणि देव याला मुलगा मानून अल्पवयीन देवला फॅमिली पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इतर सेवा लाभांमध्ये तीन पक्षांचा हिस्सा निश्चित केला होता.

मात्र, हायकोर्टाने कायदेशीर वारस असणे आणि एखाद्या विशिष्ट सेवा लाभासाठी पात्र असणे या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com